महाराष्ट्र

Assembly Election : बावनकुळेंची दमदार एन्ट्री; कामठीतून पुन्हा मैदानात

Chandrashekhar Bawankule : 2019 मध्ये नाकारले होते तिकीट; म्हणाले, 'पक्षाचा आदेश सर्वोपरी'

Kamthi constituency : चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019 मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. मला पक्षसंघटनेचे कार्य करण्याचे आदेश आहेत, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. पण बावनकुळेंना संयम राखण्याचे गिफ्ट मिळाले. त्यांची पहिले विधानपरिषदेत वर्णी लागली आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा मानही मिळाला. ते पुन्हा मैदानात आल्याने कामठी मतदारसंघाबाबत भाजप निश्चिंत झालेला असेल, हे निश्चित.

2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळविला होता. त्यांनी पहिल्या निवडणुकीत सुनिता गावंडे आणि नंतर राजेंद्र मुळक या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना पराभूत केले होते. त्यामुळे कामठी मतदारसंघात त्यांचा दबदबा होता. मात्र, 2019मध्ये फासे फिरले आणि बावनकुळेंचे तिकीट कापण्यात आले. तो त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्याचवेळी एकनाथ खडसे, विनोद तावडे या दिग्गजांनाही तिकीट नाकरण्यात आले होते. हे सारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप करण्यात आला.

एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी फडणविसांच्या बाबतीत नाराजी बोलूनही दाखवली. खडसेंनी तर जाहीर पंगा घेतला. पक्षातून बाहेर पडेपर्यंत त्यांना निर्णय घ्यावा लागला. तावडेंनी पक्षसंघटनेचे काम सुरू केले. ते राष्ट्रीय कार्यकारीणीपर्यंत पोहोचले. पण चंद्रशेखर बावनकुळे मात्र अस्वस्थ होते. व्यक्तही होता येत नव्हते आणि एखाद्या कृतीमधून पक्षाची शिस्तही मोडायची नव्हती. अशात त्यांची कोंडी झाली होती.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक जागा येऊनही भाजपची सत्ता येऊ शकली नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. डिसेंबर 2021 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे विधानपरिषदेवर आले. ही जागा स्थानिक स्वराज्य संस्थेची होती. ही निवडणूक देखील बावनकुळेंसाठी खास ठरली होती. त्यानंतर 2022 मध्ये बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी देण्यात आली. तेव्हापासून त्यांचा ग्राफ वाढताच आहे. राज्यात मंत्री नसतानाही त्यांच्या हाती सगळे पॉवर होते. बहुधा राज्यातील सर्व मोठ्या घडामोडींचे ते जवळून साक्षीदार ठरले. अनेक घडामोडींमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभागही होता.

Ballarpur Constituency : असंख्य विकासकामे अन् मुनगंटीवार यांना पुन्हा संधी

असे आले विधानपरिषदेवर

2021 मध्ये विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थेची जागेसाठी निवडणूक झाली. भाजपचे निष्ठावान मानले जाणारे डॉ. रविंद्र (छोटू) भोयर यांनी त्यावेळी उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला होता. पण बावनकुळेंना उमेदवारी मिळाल्याने भोयर काँग्रेसमध्ये गेले. नगरसेवक फुटू नयेत म्हणून भाजपने आपले नगरसेवक सहलीवर पाठवले होते. त्याचवेळी काँग्रेसने एक खेळी खेळली. मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने अधिकृत फतवा काढला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. याचा फायदा बावनकुळेंना झाला. या निवडणुकीत भोयर यांना केवळ एकच मत मिळालं होतं, हे विशेष.

पक्षाचा आदेश सर्वोपरी

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांचे आभार मानले. त्याचवेळी पक्षाचा आदेश आपल्यासाठी सर्वोपरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 2014 मध्ये मला पक्ष संघटनेचे काम करायला सांगितले. मी तसेच केले. आताही मला निवडणूक लढण्यास सांगितले आणि मी तयार आहे, असंही बावनकुळे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!