Assembly Election : लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर कार्यकर्त्यांना अगदी तळहातावरील फोडा सारखा जपणार असल्याचा देखावा करणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर यांनी आता काम झाल्यानंतर कार्यकर्त्यांवर दुर्लक्ष करीत आहे. ‘काम झाले आमचे, काय करावे तुमचे’, अशा पद्धतीने खासदार धानोरकर आता काँग्रेस कार्यकर्त्यांशी वागत आहेत, असा संताप व्यक्त करीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चांदसूर्ला ( खैरगाव)गावातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
निवडणुकीच्या काळात आम्ही सर्वांनी धानोरकर यांच्या विजयासाठी दिवस-रात्र एक केला. परंतु आता खासदार झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी आम्हाला बाजूला केलं आहे, असा संताप बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते आता व्यक्त करीत आहेत. सुधीर मुनगंटीवार हे माणुसकी आणि कार्यकर्त्यांना जपणारे नेते आहेत, हे ठाऊक होतं. पण तरीही धानोरकर यांच्याकडून झालेल्या ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ला बळी पडल्याची कबुली अनेक कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळेच आता त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे.
मुनगंटीवार यांच्यावर विश्वास
सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यात काही वरिष्ठ नेत्यांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीपूर्वीही आता हा क्रम सुरू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदासंघातील चांदसूर्ला (खैरगाव) येथील काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यामुळेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, चंदेलसिह चंदेल, अनिल डोंगरे, अर्जुन नागरकर यांची उपस्थिती होती.
Sudhir Mungantiwar : शेतीचा व्यवसाय मजबुरीचा नाही, तर मजबुतीचा होणार !
आमची काँग्रेसने मन दुखावली
लोकसभा निवडणुकीला आता पाच ते सहा महिने लोटून गेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक काळात युवा कार्यकर्त्यांना आश्वासने देऊन स्वप्ने दाखविली होती. त्याची कुठेही पूर्तता होताना दिसत नसल्यामुळे काँग्रेसचे युवा कार्यकर्ते नाराज झालेत. त्यांनी नेत्यांची संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु नेहमीप्रमाणे त्यांना कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे मनापासून दुखावलेल्या या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जयेंद्र ताजने, बबलू आत्राम, सतीश हेलवडे, विजय गौरकार, नितीन ढोके, अतुल हेलवडे, चंद्रकांत दातारकर, लक्ष्मण नागरकर, रवी हेलवडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
चांदसूर्ला गावातील काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्यामुळे बल्लारपूर विधानसभे सोबतच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांना साथ देणाऱ्या अनेक कार्यकर्ते नाराज आहे. अशी चर्चा आहे.