महाराष्ट्र

Assembly Elections : घाषणेपूर्वीच रवी राणा ‘अधिकृत’ उमेदवार!

Amravati Constituency : अमरावतीत झळकले बॅनर; राजकीय चर्चा जोरात

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. इच्छुकांकडून निवडणुकीसाठी मोठी मोर्चेबांधणी होत आहे. अमरावतीत निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशातच बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या बॅनरवरून चर्चांना उधाण आले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार रवी राणा यांचं बॅनर व्हायरल झालं आहे. अद्यापही उमेदवारी जाहीर नसताना बॅनर झळकल्याने चर्चा रंगली आहे.  

राज्यात मनसे आणि वंचित सोडले तर अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. अशातच काहीजण स्वतःच उमेदवारी घोषित करून प्रचाराला लागले आहेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात अशीच एक चर्चा रंगली आहे. विद्यमान आमदार रवी राणा यांच्या व्हायरल झालेल्या बॅनर मुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आमदार राणा यांच्या बॅनर वर महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर त्यांचा फोटो आणि पाना निशाणी असा उल्लेख बॅनरवर आहे. हे बॅनर सध्या अमरावतीत चर्चेचा विषय बनले आहे. अद्यापही उमेदवारी जाहीर नसताना स्वतःच आपली उमेदवार जाहीर केली का, असा सवाल उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी केला होता दावा!

उमेदवारी पक्की असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. तर मीच अधिकृत उमेदवार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हिरवी झेंडी दिली आहे, असं ते म्हणाले होते. ‘गेल्या दहा पंधरा वर्षांपासून मी महायुतीसोबत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करतात, शुभेच्छा देतात, बॅनर लावतात. तोच उत्साह त्या बॅनरच्या माध्यमातून झळकला आहे. मीच आमदार आहे, मीच अधिकृत उमेदवार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हिरवी झेंडी दिली आहे. जे आमदार महायुती सोबत आहेत त्यांच्यासाठी त्या जागा सुटणार आहेत. तर काही जागा आम्ही मागितल्या आहेत,’ असेही ते म्हणाले.

Sudhir Mungantiwar : जय शिवाजी म्हटलं तरी अंगावर रोमांच येतात

काही विघ्न संतोषी लोक असतात. ज्यांना आपण लोकसभेमध्ये देखील पाहिलं. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचं काम काही लोकांनी केलं. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते काम करतात. त्याला काही इलाज नाही. त्यांचा पक्ष, त्यांचे नेते त्या बाबत निर्णय घेतील. असे म्हणत त्यांनी नाव न घेता बच्चू कडू यांच्यावर टीकाही केली आहे.

तुषार भारतीय यांचा विरोध!

आमदार रवी राणा यांच्या उमेदवारीला भाजपचे तुषार भारतीय यांनी विरोध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. रवी राणा आणि भाजपच्या तुषार भारतीयांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बडनेरामधून उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीसांकडून हिरवा कंदील मिळाल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते तुषार भारतीय देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून रवी राणांना त्यांनी विरोध केला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!