महाराष्ट्र

Maharashtra BJP : प्रवक्त्यांना प्रशिक्षणातून धडे

Assembly Election : निवडणूक काळामुळे सांगितले ‘डुज अॅन्ड डोन्ट्स’

Tips How To Talk : विधानसभा निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आहे. अशात सर्वच नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी ‘कम बोलो, धीरे बोलो, मिठा बोलो’ असा सल्ला दिला आहे. भाजपकडूनही अशा पद्धतीचे प्रशिक्षण आता देण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने प्रवक्ता आणि प्रसिद्धी प्रमुखांना ‘डुज अॅन्ड डोन्ट्स’ सांगितले आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, राष्ट्रीय प्रवक्ता खासदार सुधांशु त्रिवेदी, भाजपा माध्यम विभागाचे केंद्रीय समन्वयक आमदार अतुल भातखळकर आदीनी या टीप्स प्रवक्ता आणि प्रसिद्धी प्रमुखांना दिल्या आहेत.

संपूर्ण विदर्भातून प्रवक्ता आणि प्रसिद्धी प्रमुखांना नेत्यांकडून काही टीप्स देण्यात आल्या. निवडणूक काळात काय करायचे, काय बोलायचे यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी अनेक मुद्द्यावर अपप्रचार केल्याचं महायुतीकडून सांगण्यात येत होतं. विरोधकांच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यात कमी पडल्याचं महायुतीचे नेते सांगत होते. अशात महाविकास आघाडीमधील प्रत्येक आरोपाला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी महायुतीने विशेषत: भाजपने चालविली आहे. त्याची तयारी जिल्हास्तरावरही करण्यात आली आहे.

नेत्यांसह कार्यकर्ते सज्ज

कोणत्याही निवडणूक काळात प्रवक्ता आणि प्रसिद्धी प्रमुखांची भूमिका मोलाची असते. पक्षातील सभा, संमेलन, कार्यक्रम, मेळावा, नेत्यांच्या दौऱ्याची व्यवस्था याच्या प्रचार-प्रसाराची महत्वाची धुरा प्रसिद्धी प्रमुखांवर असते. नेत्यांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोप आणि अपप्रचाराला प्रसंगी चोख प्रत्युत्तर प्रवक्त्यांना द्यावे लागते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप गल्ली ते दिल्लीपर्यंत तयार आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक आरोपाला भाजपचे नेते सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. तशीच तयारी जिल्हा पातळीवरही करण्यात आली आहे.

Assembly Election : महायुतीत अ‍ॅडजस्टमेंट! भाजपचे माजी मंत्री अजित पवारांसोबत?

या मुद्द्यांना प्राधान्य

निवडणुकीत भाजपची भूमिका काय असेल, कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे आहे यासंदर्भातील माहिती प्रवक्ता आणि प्रसिद्धी प्रमुखांना देण्यात आली आहे. महायुतीमधील तीनही घटक पक्षांनी मतभेद वाढतील असे वक्तव्य करू नये, असा सल्ला सर्वांना यापूर्वीच देण्यात आला आहे. आता यासंदर्भात प्रवक्ता आणि प्रसिद्धी प्रमुखांनाही माहिती देण्यात आली आहे. पक्षाकडून वेळोवेळी येणारे फोटो, व्हिडीओ, प्रसिद्धी पत्रकांचे वितरण यावर यंदा प्रसिद्धी प्रमुखांना आधीपेक्षा जास्त भर द्यावा लागणार आहे. प्रचार-प्रसारासंदर्भात इतर पक्षाच्या तुलनेत भाजप आधीपासून नियोजन करून काम करतो. मात्र लोकसभा निवडणुकीतील अनुभवांच्या आधारे विधानसभा निवडणुकीत प्रचार तंत्रात व्यापकता आणण्यात आली आहे. त्यातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम भाजप करीत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!