New Beginning : ‘कानून अंधा होता हैं..’ असे आतापर्यंत बोलले जायचे. पण भारताच्या सरन्यायाधीशांनी आता या न्यायदेवतेला अंधत्वाच्या काळोखातून बाहेर काढले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्याय देवता असलेल्या ‘लेडी ऑफ जस्टिस’ची नवीन मूर्ती तयार करून घेतली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या या मूर्तीच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर तलवारी ऐवजी न्यायदेवतेच्या हातात भारतीय संविधान देण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वाचनालयात हा पुतळा बसवण्यात आला आहे. देशातील कायदा आंधळा नाही आणि तो शिक्षेचे प्रतीक नाही, असा संदेश देणे हा त्याचा उद्देश आहे. जुन्या मूर्तीवरील डोळ्यावर पट्टी कायद्याच्या नजरेत सर्व समान असल्याचे दर्शवत होती. तर तलवार हे अधिकाराचे आणि अन्यायाला शिक्षा देण्याच्या सामर्थ्याचे प्रतीक होते. समन्यायाधीशानी तयार करून घेतलेल्या मूर्तीच्या उजव्या हातात तराजू कायम ठेवण्यात आला आहे.
संतुलन कायम
न्यायदेवतेच्या हातात असलेल्या तराजूला समाजातील संतुलनाचे प्रतीक देण्यात आले आहे. न्यायालय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे तथ्य आणि युक्तिवाद पाहते आणि ऐकते. न्यायदेवतेच्या हातात असलेला तराजू हेच दर्शवतो. अलीकडेच, भारत सरकारने ब्रिटिश राजवटीत लागू असलेल्या भारतीय दंड संहिता (IPC) कायद्याच्या जागी भारतीय न्याय संहिता (BNS) कायदा लागू केला. ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा हा प्रयत्न होता. अशातच आता लेडी ऑफ जस्टिसच्या पुतळ्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
Maharashtra Assembly Election : राजकीय नेत्यांच्या परीक्षेचा काळ
कायदा आंधळा नसून तो सर्वांना समानतेने पाहतो, असे सर्व न्यायाधीश चंद्रचूड यांचे मत आहे. न्यायालय पैसा, संपत्ती आणि समाजातील वर्चस्वाचे इतर मापदंड पाहत नाही. मूर्तीच्या हातात तलवार नसून संविधान असावे, जेणेकरून संविधानानुसार न्याय मिळतो, असा संदेश देशाला जाईल. लेडी ऑफ जस्टिस ही जस्टिशिया आहे, रोमन पौराणिक कथेतील न्यायाची देवी. रोममध्ये जस्टिशियाचे मंदिर आहे. जगातील अनेक देशांमध्ये, न्यायदेवतेची ही मूर्ती न्यायालये, कायदेशीर कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दिसून येते.