महाराष्ट्र

Baba Siddique Case : हत्या प्रकरणातील आरोपीची पोस्ट

Mumbai Firing : शिवकुमार गौतम याची रील व्हायरल

Murder Investigation : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे. याप्रकरणातील एक आरोपी शिवकुमार गौतम याची इन्स्टाग्राम रील चर्चेत आली आहे. गौतम याने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर गुन्हेगारी संदर्भात एक रील अपलोड केलं होतं. सध्या शिवकुमार हा फरार आहे. त्याचं हे रील 24 जुलै रोजीचं आहे. ‘यार तेरा गँगस्टर है जानी’, असं त्यानं लिहिलं होतं. केजीएफ चित्रपटातील गाण्यावर त्यानं हे रील अपलोड केलं होतं.

रील व्हायरल 

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. टोळीतील एका सदस्याने यासंर्भात पोस्ट व्हायरल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. हल्ल्याच्या घटनेतील आरोपी शिवकुमारचा शोध पोलिस घेत आहेत. गोळीबारानंतर काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. 12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे या ठिकाणी बाबा सिद्दीकी हे त्यांच्या मुलाच्या ऑफिसकडे जात होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला.

शुभूचा शोध सुरू

सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्यावतीने एकाने स्वीकारली आहे. शुभू लोणकर यांच्या फेसबुक अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. लोणकर हा अकोला जिल्ह्यातील अकोट येथील मूळ रहिवासी आहे. शुभम रामेश्वर लोणकर या नावाच्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. शुभमचे नाव पोलिस रेकॉर्डवर आहे. त्याच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली आहे.

लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असलेल्या शुभम लोणकरला अकोला पोलिसांनी बंदूक तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्यामुळे शुभम लोणकर आणि शुभू लोणकर हा एकच व्यक्ती असू शकतो, असा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रवीण लोणकरच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. प्रवीण हा शुभमचा भाऊ आहे.

Baba Siddique : धमकी मिळाल्यानंतर दिली होती सुरक्षा

धाडसी कारवाई

बाबा सिद्दीकींच्या दोन मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडलं आहे. राजेंद्र दाभाडे हे आरोपींना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. दाभाडे हे निर्मल नगर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) पदावर कार्यरत आहेत. दसऱ्याचा दिवस होता आणि विसर्जन मिरवणूक निघाली होती त्यामुळे राजेंद्र दाभाडे बंदोबस्त पाहात होते. सिद्दीकींवर गोळीबाराची माहिती मिळताच दाभाडे हे आरोपींना पकडण्यासाठी रवाना झालेत. आरोपींच्या हातात बंदुका होत्या. परंतु त्यानंतरही दाभाडे यांनी दोघांना पकडले. त्यांच्या हातातील बंदूक हिसकावली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!