प्रशासन

Narendra Modi : मेडिकल कॉलेज ठरेल सेवाकेंद्र

Buldhana Medical College : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

Initiation Of Patient Care : बुलढाणा येथील नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आमदार संजय गायकवाड व श्वेता महाले यावेळी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासासाठी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गरिब, गरजू विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचे पाऊल असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. धाड मार्गावर असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालय येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थिताना ऑनलाइन संबोधित केले. नव्याने निर्माण होणारे वैद्यकीय महाविद्यालय लाखो परिवारांच्या सेवेचे केंद्र ठरेल. या केवळ संस्था ठरणार नाहीत. असंख्य परिवारांचे जीवन घडविण्याचा यज्ज्ञ आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 900 जागा निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता राज्यभरात सहा हजार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध होतील. दुर्गम भागात नव्या संधीची दालने उपलब्ध होतील. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून लाखो परिवारांना मोफत उपचार मिळत आहे. जनऔषधी केंद्रातून स्वस्तात औषधी मिळत आहेत. कर कमी करून हृदयरोग आणि कॅन्सरवरील औषधोपचाराचा खर्च कमी करण्यात आला आहे. या माध्यमातून गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

विद्यार्थ्यांना लाभ

प्रत्येक नागरिकाला माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकार कटिबद्ध आहे. केंद्र व राज्य सरकार वैद्यकीय महाविद्यालयांकडे लक्ष देत आहे. राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन महाविद्यालयाच्या निर्मितीमुळे मोठा दिलासा मिळेल. प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून शिक्षण घेता येईल. यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही वैद्यकीय शिक्षणात अग्रक्रमावर राहतील, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार श्वेता महाले म्हणाल्या की, अनेक वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्याचा आनंद आहे. यातून गरजू, गरिब विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. वेळ, खर्चाची बचत होईल. स्थानिकांना त्याचा लाभ होणार आहे. आमदार संजय गायकवाड म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय येण्याठी बरेच प्रयत्न झालेत. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळेच महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे. दुर्धर आजार, मोठ्या शस्त्रक्रियांसाठी जिल्हाबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. गोरगरीबांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण व अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

Uddhav Thackeray : शिवसेना प्रमुख म्हणाले शाब्बास

यशस्वी वाटचाल

वैद्यकीय शिक्षणामध्ये भविष्य घडविणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातून यशस्वी वाटचाल करता येणार आहे. यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी शासकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांविषयी थोडक्यात विवेचन केले. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी प्रास्ताविक केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालया माहिती त्यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!