‘द लोकहित’ दिलेली बातमी पुन्हा एकदा खरी ठरली आहे.भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तुमसर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांनी एक मोहीम फत्ते केली आहे. अजित पवार यांच्या सभेला अनुपस्थित राहून सभास्थळी निर्माण होणारी अडचण दूर न करने तुमसरच्या प्रभारी मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांना भोवले आहे.
आमदार राजू कारेमोरे यांच्या तक्रारीनंतर शासनाने तुमसर मुख्याधिकारी पदावरून बदली केली आहे. त्यासंबंधी राज्यशासनाचा आदेश सुद्धा काढण्यात आला आहे. त्यांच्या जागी जुम्मा प्यारेवाले नवे मुख्याधिकारी म्हणून रुजू होत आहे. विशेष म्हणजे प्रभारी मुख्याधिकारी वैद्य यांनी आमदार कारेमोरे यांच्या सोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप वायरल केली होती. त्यामुळे कारेमोरे अधिक संतापले होते.
मुंबई गाठले
मुख्याधिकारी प्रकरणी थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी तक्रार केली होती. त्यांचा परिणाम म्हणून मुख्याधिकारी वैद्य यांचा तुमसर येथील पदाचा प्रभार काढून घेण्यात आला आहे. या घटनेनंतर आमदार राजू कारेमोरे यांनी संभाषणात दिलेल्या धमकीनुसार मुख्याधिकाऱ्याला निपटवल्याचे बोलले जात आहे.
तुमसर शहरातील नेहरु मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रेची सभा 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. स्वत: पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार येत असल्याने कार्यक्रम सुव्यवस्थित पार पाडण्याकरीत आमदार राजू कारेमोरे यांनी मुख्याधिकारी यांना सभेला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आमदार कारेमोरे यांच्या सूचनेला नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी न जुमानता चक्क गैरव्यवस्थेला पाठबळ दिले, असा आरोप होत आहे.
असल्याने आमदारांनी भ्रमणध्वनीवरून संबधित मुख्याधिकाऱ्यांना चांगली तंबी दिली. इतकेच नाही तर सदर संभाषणाची ऑडिओ क्लिप मुख्यधिकारी यांनीच आपल्या भ्रमणध्वनीवरून वायरल केल्याचे कळून आल्यावर आमदार कारेमोरे याचा संताप शिगेला पोहचला. मुंबईचे तंत्र हालवत त्यांनी महिला मुख्याधिकाऱ्याला तुमसरातुन जय महाराष्ट्र करायला लावला.
‘माजीची’ हवा टाईट
ऑडिओ क्लिप वायरल प्रकरणात घरचा भेदी निघाल्याचे वृत ‘द लोकहित’ने दिले होते. महिला मुख्याधिकाऱ्याने आमदाराची ऑडिओ वायरल केल्याचा आरोप होत होता. असे असताना मात्र ही क्लिप आमदार राजू कारेमोरे यांच्याच राष्ट्रवादीतील एका माजी नगराध्यक्षाने व्हायरल केल्याचे समोर आले आहे. हे कळताच आमदार आणि त्या माजी नगराध्यक्षाचे चांगलेच भांडण झाले होते. दोघांनीही मुंबई गाठली. आमदाराने त्या वादग्रस्त महिला मुख्याधिकाऱ्याला तुमसरातून हटविण्यासाठी तर त्या माजी नगराध्यक्षाने मुख्याधिकाऱ्याची बदली थांबविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र माजी नगराध्यक्षाचे प्रयत्न निष्फल ठरले आहे. या गटात अशांतता पसरली आहे.