प्रशासन

Gondia : निवडणुकीची तयारी; 7 अट्टल गुन्हेगार हद्दपार!

Crime : तीन जिल्ह्यांतून केली सफाई; गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी कारवाई

Superintendent of Police Gorakh Bhamre : गोंदिया जिल्ह्यात नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी गुंडांवर आपला वचक बसविण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वी अटट्ल गुन्हेगारांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच राज्यात आचारसंहिता लागू होणार असल्याने कारवाईचा वेग वाढल्याचे बोलले जात आहे. गोंदियातील तब्बल 7 अट्टल गुन्हेगारांना तीन जिल्ह्यांतून हद्दपार केल्याची प्रक्रिया नुकतीच त्यांनी पार पाडली आहे. गोंदिया व देवरी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील आणखी सात अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर करण्यात आले आहे. यात गोंदिया शहर हद्दीतील तीन, गंगाझरी दोन तर रामनगर व सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एक अशा सात अट्टल गुन्हेगारांचा समावेश आहे. गोंदिया जिल्हा हद्दीतून तीन महिन्यांकरिता त्यांना हद्दपार केले आहे.

येवढे आहे गुन्हेगार..

यामध्ये शहर ठाण्याच्या हद्दीतील कोमल रमेश बनकर (30, रा. चावडी चौक, छोटा गोंदिया) याच्यावर विविध पोलिस ठाण्यात 20 गुन्ह्यांची नोंद आहे. जय सुनील करियार (46, रा. हनुमान मंदिर समोर, दसखोली) याच्यावर विविध पोलिस ठाण्यात 31 गुन्ह्यांची नोंद आहे. प्रमोद हिरामण गजभिये (50, रा. लक्ष्मीनगर, गोंदिया) याच्यावर विविध पोलिस ठाण्यात 17 गुन्ह्यांची नोंद आहे. गंगाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार राकेश रामदास मडावी (35, रा. गंगाझरी) याच्यावर विविध पोलिस ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद आहे.

योगराज भाऊलाल माहूरे (47, रा. कोहका, ता. जि. गोंदिया) याच्यावर विविध आठ गुन्ह्यांची नोंद आहे. रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार राहुल दिनेशसिंह बरेले (20, रा. कॉलेजटोली, कुडवा) याच्यावर विविध ठाण्यात नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. तर सालेकसा ठाण्याच्या हद्दीतील अजय रघुवीरप्रसाद अग्रवाल (53, रा. साखरीटोला, सालेकसा) याच्यावर सहा गुन्ह्यांची नोंद आहे. या सातपैकी सहा आरोपींना गोंदिया, भंडारा व बालाघाट जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर तीन महिन्यांकरीता हद्दपार करण्यात आले. तर अजय अग्रवाल याला देवरी उपविभाग अंतर्गत तालुका देवरी, आमगाव व सालेकसा हद्दीतून तीन महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

Akola Tension : लोक फक्त कर्फ्युत मरायला आहेत का?

सुरक्षेचे निर्देश 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांविरुद्ध विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी, वाढत्या गुन्हेगारी व गुन्हेगारांवर वचक बसावा. गुन्हेगारी प्रवृत्तींना कोणताही थारा दिला जात नाही हा संदेश जनमानसात जावा. म्हणून सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश काढून तीन महिन्यांच्या कालावधीकरिता त्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केल्याचे बोलले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!