महाराष्ट्र

Assembly Election : काँग्रेसच्या मुलाखती आटोपल्या; अहवाल श्रेष्ठींकडे 

Congress : चारही विधानसभांवर दावा, इच्छुकांनी दर्शविली तयारी

Gondia : आगामी निवडणुकीसाठी सगळेच पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीचे सत्र सुरू झाले आहे. याचा अहवाल थेट पक्ष श्रेष्ठींना मिळणार असून कोणत्या इच्छुकांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याची उत्सुकता आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून 6 सप्टेंबरला साकोली येथे गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय इच्छूकांची मुलाखत घेण्यात आली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी बंद खोलीत इच्छूक उमेदवारांना बोलावून निवडणूक संदर्भातील चर्चा केली. तयारीचा आढावा घेतला. काल सायंकाळपर्यंत गोंदिया जिल्ह्याच्या विधानसभा क्षेत्रनिहाय मुलाखत सुरू होत्या.

ठाकरे गट व काँग्रेस यांच्यात लढत 

गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यात एकूण सात विधानसभा क्षेत्र आहेत. त्यातल्या त्यात गोंदिया जिल्ह्यात 4 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. आघाडी धर्मातील तिन्ही पक्ष गोंदिया जिल्ह्यात निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. गोंदिया विधानसभा क्षेत्रात माविआतील ठाकरे गट व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. तर तिरोडा व अर्जुनी मोरगाव या दोन विधानसभा क्षेत्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस निवडणूक लढविणार हे उघडपणे पहावयास मिळत आहे. असे असले तरी काँग्रेस पक्षाकडून चारही विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. या अनुसंगाने इच्छुकांची गर्दी पहावयास मिळत आहे.

Government Service : कर्मचारी गोंदियाचे कार्यालय मात्र भंडाऱ्यात

शक्ती प्रदर्शन

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात 20 हून अधिक, गोंदिया विधानसभा क्षेत्रात 10 हून अधिक, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात 11 तर तिरोडा विधानसभा क्षेत्रात 10 हून अधिक इच्छूक कामाला लागले आहेत. काल (6 सप्टेंबर) पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे माजी मंत्री सतिश चतुर्वेदी हे साकोली येथे आले होते. दरम्यान गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखत घेतली. एक-एक इच्छुकांना बंद खोलीत बोलावून पक्ष संघटन, समर्थक कार्यकर्त्यांची फळी, पक्षासाठी इच्छूकांचे समर्पित कार्य व निवडणुक लढविण्याच्या अनुसंगाने तयारी, याबाबतचा आढावा घेतला असल्याची माहिती आहे. दरम्यान मुलाखत स्थळावर इच्छुकांनी आपले शक्ती प्रदर्शन केल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी कालची मुलाखत कार्यक्रम हा नावापुरताच आयोजित असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले उमेदवारांबाबत निर्णय घेणार, असेही मानले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!