महाराष्ट्र

NCP Sharad Pawar : चंद्रपुरात धक्का; पोंभुर्णाचे ओबीसी तालुकाध्यक्ष भाजपात

BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याची घोषणा

Tergiversation : सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचा कायापालट केला. त्यांची विकासाची दृष्टी सर्वसमावेशक आहे. जातीपातीच्या राजकारणापलीकडे मुनगंटीवार केवळ विकासाला प्राधान्य देतात. त्यामुळे आपण त्यांच्या सोबत विकासाच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच आपण भाजपमध्ये प्रवेश घेतल्याचे पोंभूर्णा येथील संजय पावडे यांनी जाहीर केले. पावडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात कार्यरत होते. पोंभूर्णा येथील ओबीसी सेलचे ते तालुकाध्यक्ष होते. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला.

पावडे यांच्यासह आता त्यांच्या अनेक समर्थकांनी हाती कमळ घेतले आहे. देवेद्र कष्टी हे देखील भाजपमध्ये आले आहेत. कष्टी हे नवेगाव मोरे येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद बोबडे, साईनाथ पिंपळकर, गजानन मोरे, बापुजी गौरकर, रितिक शेमले, मनोज कोवे, प्रज्वल पावडे, धनराज मोरे, मयूर पावडे, अविनाश कोवे, मनोज पिंपळकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंचायत समितीचे उपसभापती विनोद देशमुख, भाजपचे महामंत्री हरीश ढवस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.

इनकमिंग सुरू

लोकसभा निवडणुकीपासून (Lok Sabha) भाजपमधील इनकमिंग कायम आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजपमध्ये प्रेवश केला होता. काँग्रेसमध्ये अन्याय होत असल्याचे नमूद करीत ते भाजपमध्ये आले होते. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या महिला प्रमुख उज्ज्वला नलगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्षही भाजपमध्ये आलेत.

Sudhir Mungantiwar : वनमंत्री झाले गोंडवाना विद्यापीठातून डॉक्टर

विजय बाल्की, मारेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमण डोहे, संतोष मत्ते, सविता माशिरकर हे देखील सुधीर मुनगंटीवार यांच्यावरच विश्वास ठेवत भाजपमध्ये आलेत. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार हे देखील मुनगंटीवार यांच्यासोबत आले आहेत. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण पोटदुखे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आता इनकमिंगचा हा क्रम विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेवत अनेक पक्षातील पदाधिकारी भाजपकडे वळल्याचे दिसत आहे. त्यामुळे चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार हे केवळ विकासाचे राजकारण करतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!