महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : महिलांच्या संस्थेला ‘दुर्गावती’चं नाव!

Veerangana Rani Durgavati : मुनगंटीवारांच्या प्रयत्नांमुळे ‘ऐतिहासिक’ निर्णय

Government Industrial Training Institute Chandrapur : 500 वर्षांपूर्वी सम्राट अकबराला आव्हान देणारी वीरांगना राणी दुर्गावती हिचं नाव महिलांना समर्पित शासकीय संस्थेला देण्यात आलं आहे. वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यानंतर राज्य सरकारने हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (महिला) संदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.

गोंड राजे दलपतशाह यांच्या निधनानंतर 15 वर्षे गोंड साम्राज्याची धुरा राणी दुर्गावतीने एकहाती सांभाळली. नव्हे तर सम्राट अकबराला आव्हान देणारी जगातील पहिली महिलाही ठरली. 5 ऑक्टोबर 1524 हा राणी दुर्गावतीचा जन्मदिन. गेले वर्षभर पंच शताब्दी महोत्सव साजरा झाला. 5 ऑक्टोबर 2024 पंच शताब्दी महोत्सवाचा समारोप होतोय. याशिवाय राणी दुर्गावतीचा जन्म नवरात्रौत्सवातील दुर्गाष्टमीचा. अशावेळी ऐन नवरात्रात राणी दुर्गावतीचं नाव महिलांच्या एका संस्थेला मिळणं हा एक योगायोग आहे.

आदिवासींच्या समृद्ध इतिहासात राणी दुर्गावती तिच्या अफाट शौर्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे मुनगंटीवार यांनी १८ सप्टेंबर २०२४ ला संबंधित विभागाला पत्र दिले होते. चंद्रपूर येथील महिलांसाठी असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी दुर्गावती यांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांनी पाठवला. त्यानुसार सोमवार, दि. ३० सप्टेंबरला मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. सरकारने निर्णय जाहीर केला. कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्रालयाकडून मुनगंटीवार यांना यासंदर्भात पत्राद्वारे कळविले आहे.

विरांगणा राणी दुर्गावतीने आपल्या राजवटीत उत्तम प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून लौकीक प्राप्त केला. सशक्तपणे आदिवासी साम्राज्य सांभाळत शत्रूंपासून सुरक्षित ठेवले. अकबराला शरण न जाता तिने आव्हान दिले. प्रत्येक आक्रमण परतवून लावले. अखेरच्या लढाईत पराभव झाला, पण तरीही दासी होऊन जगण्यापेक्षा शहीद झाली. अशा वीरांगनेचे नाव शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेला मिळाल्यामुळे आदिवासी समाजात आनंदाचं वातावरण आहे. त्यासाठी त्यांनी मुनगंटीवारांचे आभार मानले आहेत. 

Sudhir Mungantiwar : वनमंत्री झाले गोंडवाना विद्यापीठातून डॉक्टर

५०० वी जन्मशताब्दी

विरांगणा राणी दुर्गावती यांचा ५०० वी जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) राणी दुर्गावती हिचे नाव देणे अत्यंत महत्त्वाची घटना आहे. मुनगंटीवार यांच्यामुळे हे शक्य होऊ शकले, याबद्दल आदिवासी बांधवांनी त्यांचे विशेषत्वाने आभार मानले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!