महाराष्ट्र

MLA Devendra Bhuyar : दादांच्या समर्थक आमदारांचं महिलांविषयी वादग्रस्त विधान

Amravati Meeting : देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका

New Dispute After Statement : निवडणुकीपूर्वी चर्चेत राहण्यासाठी राजकीय नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. अशातच अमरावती जिल्ह्यातील आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेलं एक वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. भुयार यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. भुयार म्हणाले, चांगली मुलगी नोकरीवाल्याला मिळते. दोन नंबरची दुकानदाराला मिळते. तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याचा गळ्यात पडतो. नोकरी नसलेल्या, शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुंबई, पुण्यात नोकरी असणाऱ्या मुलांना विवाहासाठी मागणी वाढत आहे. 

राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काही जण चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळी विधाने करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यावरून आंदोलन देखील होत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी एका कार्यक्रमात बोलताना असेच एक वक्तव्य केले. आमदार भुयार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त होत आहे. महिलांसंदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. मुलगी दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्यांना भेटत नाही. ती नोकरीवाल्या मुलाला भेटते. दोन नंबरची मुलगी कोणाला मिळते, ज्यांचा धंदा आहे. पानटपरी, किराणाचे दुकान आहे अशा मुलांना दोन नंबरची मुलगी मिळते. तीन नंबरचा जो राहिलेला गाळ आहे. ती हेबडली हाबडली पोरगी असते. ती शेतकऱ्यांच्या मुलांना मिळते.

Prataprao Jadhav : नवरात्रात महायुतीत जागावाटप

काही खरं नाही

शेतकऱ्याच्या मुलांचं काही खरं राहिलेलं नाही. जन्माला येणारं लेकरूसुद्धा हेंबाडं निघतं. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे सगळं, असं आमदार भुयार महिलांच्या दिसण्यावरून म्हणाले. महिलांच्या दिसण्याबाबत वक्तव्य केल्याने आता भुयार वादात सापडले आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या (Shiv Sena) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अंधारे यांनी भुयार यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र भुयारांचे वक्तव्य बेताल आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, आमदार देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य वाह्यात आहे. हे वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही, तर कृषिक्षेत्रात राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना आहे. कृषिक्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारे आहे. शेतकऱ्यांची टिंगल उडवणारे आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांच्याकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातली जात नाही, हे दुःखद आहे. महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी काहीही वाह्यातपणा केला, कितीही हीन वक्तव्ये केली, तरी त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगरला जात नाही. त्यांना सरकारकडून अभय मिळत आहे, अशी टीका अंधारे यांनी केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!