Forest Minister : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे येऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आदिवासी समाजाचा सन्मान वाढविला आहे. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी माझी नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. त्यामुळे राज्यपालांप्रमाणे मी देखील एक पाऊल पुढे टाकून महत्त्वाचा निर्णय जाहीर करीत आहे. पोंभूर्णाच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (Government ITT) भगवान विर बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात येत आहे. महाराष्ट्राचा वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून राज्यपालांच्या साक्षीने ही घोषणा करताना विशेष आनंद होत आहे, अशी भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
पोंभूर्णा येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्यपालांनी तमाम आदिवासी समाजाचा गौरव केला आहे. राज्यपाल आदिवासी समाजाचे पालक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडत आहेत. ‘पेसा’ कायद्याच्या माध्यमातून ते आदिवासी समाजाशी संबंधित अनेक निर्णय घेत आहेत. आयटीआयला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर करताना पालकमंत्री म्हणून मलाही आनंद होत आहे.’
आदिवासींच्या प्रगतीसाठी
राज्यपालांसह आपणही आदिवासी समाजाच्या विकासासाठी आग्रही आहोत. मेळाव्यात आदिवासी समाजातील कृलाकृती रंगकामाच्या माध्यमातून बघायला मिळाली. ही कलाकृती मनमोहक होती. अशाच कलाकृतीने राजभवनातील (Maharashtra Raj Bhavan) भिंतीही फुलाव्या, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी काही मागण्याही मुनगंटीवार यांनी राज्यपालांकडे केल्या. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील काही गावांना ‘पेसा’मध्ये (Pesa Act) समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. राज्यपालांनी त्याबाबतच्या कागदपत्रांवर स्वाक्षरीही केली आहे. ही फाईल आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. लवकरच ही गावे ‘पेसा’मध्ये येतील असा ठाम विश्वास मुनगंटीवार यांनी नमूद केला.
Sudhir Mungantiwar : वनमंत्र्यांचा दणका; राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याची रक्कम
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील गावांचा समावेश करण्याची घोषणाही सुधीर मुनगंटीवार यांनी मेळाव्यात केली. पोंभूर्णातील मेळाव्यातून मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला तीन मोठे गिफ्ट दिले आहेत. आयटीआयला वीर बिरसा मुंडा यांचे नाव, गावांचा पेसामध्ये समावेश आणि जनवन योजनेचा गावांना लाभ, असे तिहेरी गिफ्ट आहे. यातून पोंभूर्णा तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये (Tribal Village) विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पोंभूर्णातील गावांना प्रातिनिधिक स्वरूपात 25 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरणही आदिवासी मेळाव्यात करण्यात आले. आता या गावांना दरवर्षी निधी मिळणार आहे.