प्रशासन

IAS R Vimla : राज्यातील विद्यार्थ्यांवर शासनाचे ‘अपार’ प्रेम

Aapar ID : संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित राहणार आयडी

Samagra Shiksha Vibhag : केंद्र सरकारकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे ‘अपार आयडी’ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अपार आयडी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यू-डायस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या कालावधीतत हे आयडी मिळणार आहेत. प्रथम प्राधान्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून द्यावेत, असे महाराष्ट्र राज्य प्राथिमिक शिक्षण परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

आयडी उपलब्ध 

महाराष्ट्र राज्य प्राथिमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक (Samagra Shiksha) आर. विमला यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना (Student) अपार आयडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपार आयडी हा 12 अंकी राहणार आहे. हा युनिक आयडी असेल. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत तो कार्यान्वित राहणार आहे. यू-डायस प्लस (Udise Plus) प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची आधार पडताळणी झाली आहे, त्याच विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यात येणार आहेत. अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती मिळणार आहे.

मागोवाही मिळणार

विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेता येणार आहे. शाळेतील (School) गळतीचे प्रमाण कमी करण्यास होईल. विद्यार्थ्यांच्या माहिती डिजिटल पद्धतीने नियंत्रण होईल. अपार आयडी तयार झाल्यानंतर तो ‘डिजी लॉकर’ला जोडण्यात येणार आहे. ‘डिजी लॉकर’ला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य कळले. दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे रिपोर्ट कळतील. विविध रिपोर्ट ऑनलाइन पद्धतीने पाहता येतील, असे विमला यांनी सांगितले. अपार आयडी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत, दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या राज्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने पाठविणे सुलभ होईल.

Chandrapur : विद्यार्थ्याची गुरुदक्षिणा; विद्यार्थी कोण तर सुधीर मुनगंटीवार!

नवीन उपक्रम

महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी विद्या समिक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार आहेत. त्या माहितीवर ग्राफिकल विश्लेषण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबविणे सोपे होईल. महाराष्ट्रासाठी राज्यस्तरावरून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर (Nodal Officer) असतील. अपार आयडी तयार करण्यासाठी राज्यभरात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा स्तरावरही अपार आयडी तयार करण्यासाठी मुख्याध्यापकांना पालकांचे हमीपत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार होतील. यू- डायस प्लस प्रणाली व विद्या समिक्षा केंद्रामार्फत अपार आयडी तयार करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!