Sudhir Mungantiwar : विदर्भात चित्रपटनगरी व्हावी, ही अनेक दिवसांची मागणी होती. गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. परंतु सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळेच विदर्भात चित्रनगरी होत आहे. यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे गोरवोद्गार शिवसेनेचे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी काढले. शुक्रवारी (ता. 27) ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ मिळाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात मुंबईत (Mumbai) सुसज्ज अशी चित्रनगरी आहे. त्यानंतर कोल्हापुरात (Kolhapur) चित्रनगरी आहे. परंतु विदर्भात अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे विदर्भातील कलावंतांना, निर्मात्यांना सातत्याने मुंबईकडे धावावे लागत होते. विदर्भ यासंदर्भात सक्षम आहे. परंतु याकडे सरकारने कधी लक्षच दिले नाही. त्यामुळे विदर्भात चित्रनगरी व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. यासाठी खरा पुढाकार घेतला तो मुनगंटीवार यांनी असे आमदार जयस्वाल म्हणाले.
रामटेकला लाभ
विदर्भातील नागपूर देशाचे मध्यवर्ती केंद्र आहे. रस्ता, रेल्वे, हवाई वाहतुकीने नागपूर जगाशी जोडले गेलेले आहे. विदर्भात प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. डोंगराळ प्रदेश आहे. नैसर्गिक जलस्रोत आहेत. गडकिल्ले आहेत. वनसंपदा आहे. परंतु या भागाकडे कधी चित्रनगरीच्या दृष्टीने लक्षच देण्यात आले नाही. आता रामटेकमध्ये 127 एकर जागेवर चित्रनगरी होणार आहे. त्यामुळे रामटेकसह विदर्भातील तरुणाईला रोजगार मिळेल. विदर्भातील कलावंतांना याच भागात चित्रपट, लघुपट आदी तयार करता येईल. त्यामुळे विदर्भातील सिनेक्षेत्राला, कला क्षेत्राला नवी भरारी घेता येईल, असेही आमदार आशिष जयस्वाल म्हणाले.
Sudhir Mungantiwar : 75 नवीन चित्रनाट्यगृहं; निःशुल्क चित्रीकरण!
लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtta Assembly Election) होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होईल. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच चित्रनगरीचे भूमिपूजन होईल, असे आमदार आशिष जयस्वाल म्हणाले. विदर्भातील चित्रनगरी आधुनिक व सुसज्ज अशीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील कलावंत (Actor), निर्मात्यांना लागणाऱ्या आवश्यक परवागीची प्रक्रिया सोपी व सुटसुटीत होणार आहे. त्यांना कमीत कमी त्रासात चित्रीकरणासाठी परवानगी मिळावी, यासाठी महत्वाचा निर्णय होणार आहे. त्यामुळे एकूणच सिनेक्षेत्राला, कलाक्षेत्राला नवी उभारी मिळेल, अशी आशाही आमदार आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळात विदर्भासह महाराष्ट्रातील सिनेसृष्टीत (Bollywood) व्यापक व सकारात्मक बदल दिसतील असेही ते म्हणाले.