महाराष्ट्र

Uday Samant : राज्याला 35 हजार नवउद्योजक दिले!

Nagpur : उदय सामंतांनी मांडला दोन वर्षांचा लेख-जोखा

Chief Minister Employment Creation Scheme : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. या माध्यमातून दोन वर्षांत 35 हजार नवीन उद्योजक आम्ही निर्माण केले. याशिवाय एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून करण्यात आली, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

75 हजार कोटींची गुंतवणूक

या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला निवडणुकीत राजकारण करता येणार नसल्याचा दावाही सामंत यांनी केला. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची आम्ही ओळख बदलवली. सुमारे 75 हजार कोटींची गुंतवणूक आली. स्टील उद्योगांचा जिल्हा म्हणून गडचिरोलीला नवी ओळख देण्यात आली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात व इतर राज्यांमध्ये पळवले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सतत केला जातो. लोकसभा निवडणुकीत सेमीकंडक्टर प्रकल्पावरून बरेच राजकारण तापले. लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी याचे चांगलेच भांडवल केले. विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांमार्फत फेक नरेटिव्ह केलं जाऊ नये, याकरिता उद्योग विभागांमार्फत दक्षता घेतली जात आहे, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत पुढे म्हणाले, ‘लाडकी बहीण योजनेचा समावेश उद्योग भरारी कार्यक्रमात करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग आणि गुंतवणूक आणल्याची माहिती पुराव्यानिशी देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात विभागनिहाय महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम घेतला जात आहे. या माध्यमातून राज्यात किती परकीय गुंतवणूक आली, किती उद्योग सुरू झाले, किती रोजगार निर्मिती झाली याची माहिती पुराव्यानिशी दिली जात आहे. त्याचे सादरीकरण केले जात आहे, असे सामंत म्हणाले.

विरोधकांकडून टीका केली जात आहे. मात्र, ही योजना उद्योग विभागात कशी आली, याचे खरे कारण सामंत यांनी सांगितले. नागपूर विभागाच्या उद्योग भरारी कार्यक्रमानंतर बोलताना सामंत म्हणाले, ‘महिलांना प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे वर्षाला 46 हजार कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. हा सर्व पैसा बाजारात येणार आहे. त्यातून नवे छोटे मोठे व्यवसाय सुरू होतील. रोजगार निर्मिती होईल.’

महिला एमआयडीसी कामठीत

नागपूरच्या एमआयडीसीमध्ये आता जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे रामटेक आणि कामठी तालुक्यात तीन हजार हेक्टर जागा घेणार आहोत. राज्यातील पहिली महिला एमआयडीसी कामठी तालुक्यात स्थापन केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पूर्व विदर्भात स्टार्टअपच्या माध्यमातून 35 हजार नवे उद्योजक तयार झाले असल्याचंही सांगितलं.

Gondia : आदिवासींचा निधी जातो कुठे?

सकाळी साडेनऊपूर्वीच बोलणार!

महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे. अनेक नेते आहेत जे चांगलं बोलून आपलं राजकारण करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही कधीही वाईट बोलत नाहीत. मात्र सध्या राज्यामध्ये वाईट आणि खालच्या स्तरावर बोलण्याची स्पर्धा लागलेली आहे. सकाळी साडेनऊ वाजता तर संपूर्ण राज्याला याचा अनुभव येतो. त्यामुळे मी यापुढे साडेनऊच्या पूर्वीच पत्रकार परिषदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी कोटी सामंत यांनी केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!