महाराष्ट्र

Buldhana : सावरगाव डुकरे गावात लोकशाही मार्गाने “रणकंदन” क्षमले! 

Farmers Agitation : सामाजिक सलोख्यासाठी अन्नत्याग आंदोलन स्थगित

 Rahul Bondre : बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखलीचे राजकारण चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत. सावरगाव डुकरे या गावात माजी आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने – सामने आले आहेत. शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सहीने लिहिलेले निवेदन फाडल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी. शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी 23 सप्टेंबर पासून अन्यत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

कार्यकर्ते उपोषणाला बसले

दुसरीकडे राहुल बोंद्रे यांनी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे 94 कोटी रुपयांचे थकीत कर्ज त्वरित भरावे यासह इतर मागण्यासाठी भाजप कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. एकंदरीत चिखलीच्या राजकारणाची पार्श्वभूमी पाहता सावरगाव डुकरे येथे लोकशाही मार्गाने सुरू झालेले हे “रणकंदन” वेगळ्या मार्गावर जाण्याची शक्यता दिसत असल्याने बुधवार 25 सप्टेंबर रोजी माजी आमदार बोन्द्रे यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतेले.

 सोयाबीन, कापसाला भाव नाही, कर्जमाफी पीक विमा, सिंचन अनुदानाचे पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज नाही, महागाई प्रचंड वाढत असून दररोज 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन पोलीस प्रशसानाने फाडणे म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नाही, असा आरोप करीत सरकरारच्या विरोधात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. 

आंदोलनाला विरोध म्हणून विरोधकांनी सावरगाव डुकरे येथेच आंदोलन सुरु केल्याने गावातील सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. गावा- गावात जावून 1 लाख रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार असल्याचे रणशिंग माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी फुंकले आहे.           

बुधवार 25 सप्टेंबर रोजी माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत राहुल बोंद्रे व शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सोडविण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे बोलत होते. जगाचा पोशिंदा जीवन संपविण्याच्या विंवचनेत असताना सरकार त्यांच्या मागण्यांवर चर्चा करत नाही. शेतकऱ्यांनाच लुटायचे अन् त्यांना लंगोटी दान करायची, असे महायुती सरकारचे धोरण असल्याचेही बोंद्रे म्हणाले.

शेतकरीच सरकार बरखास्त करतील

 

शेतकऱ्यांच्या मागण्यांना केंद्र व राज्य सरकारकडे किंमत नाही. सरकार शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारत नाही. संवेदानाशून्य सरकराला शेतकरीच बरखास्त करतील, असा हल्लाबोल माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांच्या रक्तांच्या सह्यांचे निवेदन पोलीस फाडतात याच्या मागे कोण आहे, हे पाहिले पाहिजे. राहुल बोंद्रे यांच्यामागे शेतकऱ्यांचा मोठा जनाशिर्वाद आहे. ते सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतात. त्यांनी अनेक आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याचेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil : नवव्या दिवशी उपोषण स्थगित

प्रश्न मांडावे 

चिखलीचे आमदार यांनी शेतकऱ्यांप्रती असणारी तळमळ विधानसभेत मांडावी. चिखली विधानसभा मतदारसंघात जिल्हा केंद्रीय बँकेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदारांनी पाच वर्षात हा प्रश्न सभागृहात एकदाही का मांडला नाही? असा सवाल उदयनगरचे सरपंच मनोज लाहूडकर यांनी केला आहे. लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न या आयुधाद्वारे त्या विधिमंडळात आक्रमक का झाल्या नाहीत ? राहुल बोंद्रे यांना विरोध म्हणून प्रति अन्नत्याग आंदोलन सावरगाव डुकरे मध्ये करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!