महाराष्ट्र

Gondia : देवरीच्या एमआयडीसीत बेरोजगारांची थट्टा

MIDC : खासदार, आमदार फक्त निवडणुकीपुरता; नागरिकांची ओरड

Deori Taluka : गोंदियाच्या देवरी एमआयडीसीत बेरोजगारांची थट्टा सुरु आहे. उद्योगांविना एमआयडीसीचा फायदा कसा होईल? खासदार, आमदारांना फक्त निवडणुकीतच समस्यांचा पुळका का येतो? असा संतप्त सवाल देवरीचे नागरिक करीत आहेत. दुर्गम आणि नक्षलग्रस्त गोंदिया जिल्हाच्या देवरी तालुक्यात 54 ग्रामपंचायत आहेत. शेकडो गावांचा समावेश आहे. आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख आहे. त्यादृष्टीने आजपर्यंत तालुक्यातील युवक व युवतींसाठी रोजगाराची तीळमात्र उपाययोजना लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून करण्यात आली नाही, ही शोकांकिता आहे. तर देवरी शहरात असलेली एमआयडीसी देखील उद्योगांविना आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांची थट्टा करण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.

फक्त आश्वासन

गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी निव्वळ निवडणुकीच्यावेळी पोकळ आश्वासने देतात. आपला पाणगा शिजवून निघून जातात. हा आजवरचा इतिहास आहे. पण आजपर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील युवक-युवतींसाठी रोजगारासंदर्भात पाऊल उचलले नाही. कंपनी किंवा उद्योगाची साधने तालुक्यात उपलब्ध करणे त्यांना गरजेचे वाटले नाही. काही कंपन्या असल्या तरी पर राज्यातीलच लोकांना येथे प्राधान्य दिले गेले असल्याची शोकांतिका आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी, पूर यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सुशिक्षित बेरोजगार मुले प्रत्येक गावात रोजगारासाठी भटकंती करताना दिसत आहे. पण त्यांना तालुक्यात रोजगार उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या देवरी तालुक्यात वाढत आहे. मात्र याकडे कोणत्याही पुढाऱ्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे तालुक्यांतील युवकवर्ग लोकप्रतिनिधी व प्रशासनासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Gondia : ग्रामरोजगारसेवकांची शासनाकडून उपेक्षाच!

एमआयडीसी धुळखात

देवरी तालुक्यामध्ये मागील अनेक वर्षांपूर्वी एमआयडीसीची स्थापना झाली. एमआयडीसी झाल्यानंतर येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल अशी आशा होती. परंतु, बेरोजगार युवकांना वाकुल्या दाखवण्याचे कार्य येथे सुरू आहे. देवरी तालुक्यात अनेक उद्योग आणून बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. खासदार व आमदारांसारखे जबाबदार लोकप्रतिनिधी सुद्धा बेरोजगारांच्या समस्यांबाबत संवेदनशील नाहीत. मग या एमआयडीसीचे औचित्य तरी काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!