Reservation : आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा शनिवारी (ता. 21) पाचवा दिवस आहे. आतापर्यंत पाचवेळा आमरण उपोषण करणारे जरांगे यांची शनिवारी चौथ्यादिवशीच प्रकृती बिघडली. त्यांची शुगर कमी होण्याच्या जागी डॉक्टरच्या रिपोर्टनुसार शुगर वाढलेली आहे. यावरून पाटील यांनी माझा शुगर कमी होत होता. कमी होणारी शुगर वाढलीच कशी? असा सवाल करतानाच सरकारचं ऐकून माझा गेम करू नका, असा इशारात्यांनी दिला आहे.
चौथा दिवस
मनोज जरांगे यांचं हे सहावं उपोषण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांचं हे उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. 16 सप्टेंबरच्या रात्रीपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं. आज शनिवारी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या चार दिवसांत जरांगे यांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना उपचार घेण्याबाबत आग्रह केला जात आहे. पण जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालवली आहे. शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने शनिवारी जरांगे यांची तपासणी केली. मनोज जरांगे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपचार घेण्याची विनंती केली आहे. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. कमी होणारी शुगर वाढलीच कशी, असा प्रश्न जारांगेंनी डॉक्टरांना विचारला. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून अनेकांचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, जरांगे उपोषणावर ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे.
का होतोय त्रास..
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. त्यांना अशक्तपणा आला असून दोन पावलंही चालता येत नाही. चालताना त्यांना कार्यकर्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे. चालत असतानाच ते मध्येच जमिनीवर बसून घेत आहेत. गुडघ्यात डोकं घालून मनोज जरांगे बराच वेळ बसून राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपोषणस्थळी बसलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात कालवाकालव होत आहे. मनोज जरांगे स्टेजवरून खाली उतरले, पण प्रचंड थकवा वाढल्याने त्यांनी लगेच बसून घेतलं.
Buldhana : लाडक्या बहीणीने दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे!
प्रमुख मागण्या
मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी राज्यसरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा हे कुणबीच आहेत आणि त्यामुळे हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला कुणबी दाखले देत आरक्षण द्यावे, अंतरवलीसह महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे, अश्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.