महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस

Shiv Sena : आमदार संजय गायकवाडांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Reservation Issue : राहुल गांधी या देशात आरक्षण संपण्याची गरज आहे, असं सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे. मराठा समाज 50 वर्षांपासून आरक्षण मागत आहे. त्यांना आरक्षण द्यायच्या आधीच तुम्ही आता आरक्षण संपवणार आहे, असं सांगता. आरक्षण संपवण्याची भाषा तुम्ही करून राहिले. मागासवर्गीय आरक्षण तुम्ही संपवणार, यापुढं कोणी असो बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संपवण्याची भाषा केली तर त्याची जीभ छाटल्या जाईल, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावर दिला आहे.

आरक्षण मुद्द्यावरून वाद

राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल यांची जीभ छाटून आणून देणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर खळबळजनक वक्तव्य केले.

खरा चेहेरा समोर 

काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते ते बाहेर आले आहे. बाबासाहेबांनी जातींना रिझर्व्हेशन दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा हे रिझर्व्हेशन रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला. काँग्रेसने निवडणुकीत मत मागितले. आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. जो कापेल त्याला मी 11 लाख रुपये देणार, असे गायकवाड म्हणाले. महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली आहे. आंबेडकरांनी संविधानात एससी, एसटी, ओबीसी यांना समाजात ताठ मानेने जगण्यासाठी आरक्षण दिले. काँग्रेसच्या नेत्याने विदेशात जाऊन माझ्या देशातले रिझर्व्हेशन संपवायचे आहे, असे वक्तव्य केले. पोटातली मळमळ त्यांनी ओकून दाखविली. लोकसभेला फेक नरेटिव्ह ठेवून लोकांची मते घेतली, असा आरोपही संजय गायकवाड यांनी केला आहे.

MLA Sanjay Gaikwad : ..शिंदे गटाच्या आमदाराने वाचला महायुतीच्या चुकांचा पाढा

दिशाभूल

गायकवाड म्हणाले, संपूर्ण भारतामध्ये गोरगरीब जनता जगू शकत नव्हती. त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता. हक्क नव्हता. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी आदी समाजाला आरक्षण दिलं. आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे. महायुती संविधान बदलणार आहे. आता आरक्षण संपणार आहे, अशा बोंबा मारून काँग्रेसवाल्यांनी सगळ्या मागासवर्गीय समाजासह ओबीसी समाजाची दिशाभूल केली. असे गायकवाड म्हणाले. गायकवाड यांच्याच्या स्फोटक पत्रकार परिषदेत त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!