महाराष्ट्र

Assembly Election : वरुड मोर्शी मतदारसंघात देशमुख विरुद्ध भुयार

Warud Morshi Constituency : सलील अनिल देशमुख उतरणार निवडणूक रिंगणात

NCP In Field : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षातील इच्छुकांकडून मोठी मोर्चेबांधणी केली जात आहे. विविध मतदारसंघावर दावेही केले जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी मतदारसंघातून आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख लढण्याची शक्यता आहे. सलील काटोल मतदारसंघातून निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरुवातीला होती. अनिल देशमुख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात पश्चिम दक्षिण नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार, असे बोलले जात होते. 

देशमुख यांचे नाव चर्चेत

काटोल मतदारसंघात सलील अनिल देशमुख निवडणूक यांचे नाव चर्चेत होते. मात्र आता सलील देशमुख यांना नवा मतदारसंघ देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे वरूड-मोर्शी मतदारसंघात विद्यमान आमदार देवेंद्र भुयार विरुद्ध सलील देशमुख असा सामना होऊ शकतो.

वरुड-मोर्शी मतदारसंघात डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्या विरोधात देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविली होती. निवडणुकीत भुयार यांचा विजय झाला होता. देवेंद्र भुयार हे ‘स्वाभिमानी’चे एकमेव आमदार ठरले. संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी भुयार यांना घरचा रस्ता दाखवला. आता आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार (AJit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

राष्ट्रवादीची कास

आगामी विधानसभा निवडणुकीत वरुड-मोर्शी मतदारसंघात देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे. दुसरीकडे या मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख तयारी करीत आहेत. सलील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वरूड-मोर्शीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगेल.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाच्या जवळच वरूड-मोर्शी मतदारसंघ आहे. त्यामुळे कोटोल आणि वरूड-मोर्शी अशा दोन्ही मतदारसंघात सलील देशमुख यांना लक्ष देता येणार आहे. काटोल, वरुड-मोर्शी मतदारसंघात कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सलील देशमुख यांनी याआधीही मांडले आहेत. त्यामुळे सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे नवीन चेहरा म्हणून सलील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भुयार यांना तगडे आव्हान देण्यासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलील यांचे नाव पुढे येण्याची त्यामुळेच शक्यता आहे.

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री म्हणतात, विद्यमान गृहमंत्री गायब झाले

खासदार अमर काळे देशमुख यांचे निकटवर्तीय

गेल्या काही वर्षांत अनिल देशमुख यांनी वरूड-मोर्शीमध्ये जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला. त्यानंतर सलील यांनीही तोच कित्ता गिरविला. सलील निवडणुकीत उतरल्यास वर्धा लोकसभा मतदारसंघातील खासदार अमर काळे यांचा त्यांना फायदा होऊ शकतो. काळे हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत. वरुड-मोर्शीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख आणि माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्यात वाद आहे. त्याचा देखील देशमुख यांना फायदा होऊ शकतो. सलील देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यास वरुड-मोर्शी मतदारसंघात काट्याची लढत बघायला मिळेल, हे नक्की.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!