महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : माझा मुलगा असला तरी शिक्षा सर्वांसाठी समान

Nagpur : ‘हिट अँड रन’वर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

Nagpur Hit & Run case : सामाजिक आणि राजकीय जिवनात काम करणाऱ्यांच्या कुटुंबियांनी भान राखावं लागतं. त्यामुळे ज्याची चूक आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, या मतावर मी ठाम आहे. माझा मुलगा असला तरीही शिक्षा सर्वांसाठी समान असावी, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.

संकेतचा सहभाग?

नागपुरातील हिट अँड रन प्रकरणात मुलगा संकेतचा सहभाग असण्यावरून सध्या बावनकुळेंना टीका सहन करावी लागत आहे. याच प्रकरणात त्यांनी अकोला येथे भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘मी कधीही या घटनेच्या संदर्भात पोलिसांना फोन केला नाही. फक्त घटना घडली तेव्हा माहिती घेतली होती. मी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत दोन दिवस होतो. मी त्यांनाही काहीच बोललो नाही. कारण मी एका गोष्टीवर ठाम आहे. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सामाजिक किंवा राजकीय जीवनात राहणाऱ्या कुटुंबांनी याचं भान ठेवायला हवं. पोलिसांनी कुणाचाही मुलगा असो, शिक्षा समान असावी.’

Akola : राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक!

विरोधक आक्रमक

नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. संकेत बावनकुळेवर आरोप करण्यात येत आहेत. अशात अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, या प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भरधाव ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातामधील धडक देणारी कार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणात विरोधकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. सुषमा अंधारे यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी बावनकुळेंवर आरोप केले आहेत.

बावनकुळे म्हणाले, ‘हिट अँड रन प्रकरणावर बोलणं मी टाळत आहे. कारण माझ्या कुठल्याही वक्तव्यावरून पोलिसांवर दडपण येऊ नये, याची काळजी घेत आहे. एखादी खरीखुरी भूमिका मांडली तरी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करतो, असं विरोधक म्हणतील.’

75 टक्के जागांवर एकमत!

महायुतीच्या 100 जागांचे वाटप काही दिवसांनी होणार असल्याचे संकेत नेते मंडळी देत आहेत. मात्र जवळपास 70 ते 75 टक्के जागांवर महायुतीचं एकमत झालं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटल आहे. ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत तेथे कुणीही दावा करणार नाही, असं ते म्हणाले. त्याचवेळी विद्यमान आमदार बदलण्याचे संकेतही त्यांनी दिले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!