महाराष्ट्र

Nana Patole : आरक्षणविरोधी असल्याने भाजप, संघाने बोलूच नये

Congress : आरक्षणावरील राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास

Reservation Issue : राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवणारे खलनायक देवेंद्र फडणवीसच आहेत मराठा, धनगर, आदिवासी समाजाची फडणवीसांकडून फसवणूक झाली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. भारतीय जनता पार्टी त्यांच्या सवयीप्रमाणे खोटा प्रचार करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यख आमदार नाना पटोले यांनी केला.  

राहुल गांधी यांची भुमिका स्पष्ट 

आरक्षणाला संघाचाच विरोध आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे, असे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी, ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत. राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या एका विधानाची मोडतोड करण्यात आली. भाजप त्यावरून आपली राजकीय पोळी शेकत आहे. वास्तविक आरक्षणाला विरोध हा भारतीय जनता पार्टीच करत आला आहे. आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला. आपण आरक्षणविरोधी नाही. आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे, ही भुमिका असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे, असेही पटोले म्हणाले.

सर्वसमावेश न्याय असावा 

देशातील सर्व समाज घटकांना न्याय मिळायला हवा. यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटावी, अशी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची भूमिका आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. त्यामुळे आरक्षणविरोधी कोण आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही.

राज्यातील ओबीसींचे (OBC) राजकीय आरक्षण घालवणारे खलनायक देवेंद्र फडणवीसच आहेत. मराठा, धनगर, आदिवासी समाजासह इतर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन देवेंद्र फडणवीस यांनी या समाजाची फसवणूक केली आहे, असे पटोले म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकारने सचिव पदावर थेट भरती करुन एकाच विशिष्ट जातीतील समाजाच्या तरुण तरुणींची थेट भरती केली. हा सुद्धा आरक्षण संपविण्याचाच प्रकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व त्यांनी दिलेल्या संविधानाचा सर्वांत जास्त अपमान भाजपनेच केला आहे. त्यामुळे आरक्षण, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलण्याचा भाजप, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अधिकारी नाही, असे नाना पटोले म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांनी गद्दारी करीत बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष व चिन्ह चोरले. मोदी-शाह यांचे ते हस्तक आहेत. भाजपा जे सांगेल तेवढेच ते बोलू शकतात. त्यांनी आरक्षण व राहुल गांधी यांच्यावर बोलू नये. शिंदे यांनी आधी आरक्षणाचा अभ्यास करावा, असेही पटोले म्हणाले.

Nana Patole : काँग्रेसची ‘महालक्ष्मी’ योजना!

भाजपला अभ्यासाची गरज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत व भाजपची आरक्षणाबद्दलच्या भूमिकेचा अभ्यास करावा. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बोलावे. लोकसभेतील (Lok Sabha) विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी परदेशात भारताची बदनामी करत आहेत, हा आरोपही चुकीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुजरातचे मुख्यमंत्री असताना पदेशात भारताबद्दल बरेच बोलले. त्याचे व्हिडीओ यु-ट्यूब व सोशल मीडियावर आहेत. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा नीट अभ्यास करावा. मग बोलावे, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला.

error: Content is protected !!