प्रशासन

Police Inspector : पोलिसांवर गोटमार करणे भोवले

Court : न्यायालयाने घडवली अद्दल

Buldhana News : अमडापूरचे तत्कालीन ठाणेदार भूषण गावंडे यांना दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले होते. मंगरूळ नवघरे येथील आरोपी संतोष वाकडे याला येथील तदर्थ बुलढाणा जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. मुगळीकर यांनी प्रत्येकी तीन महिने कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

टाकरखेड येथे रस्त्यावर अपघात होऊन विनोद रामदास गायकवाड या इसमाचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना 18 मे 2017 मध्ये घडली होती. मृताचे नातेवाईक व गावातील 50 त 100 लोकांनी सहायक पोलिस निरीक्षक भूषण गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना मृताच्या पार्थिवाजवळ जाण्यास विरोध केला होता. त्यावेळी भूषण गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

संतोष शिवाजी वाकडे (रा. मंगरूळ नवघरे), पुंजाजी दगडू वाघ, ज्ञानेश्वर जनन्नाथ डहाके, हनुमान माधव वाघ, राजेंद्र सुखदेव वाघ यांनी पोलिसांविरोधात वक्तव्य करून जमावास भडकवत शासकीय कामात अडथळा आणला होता. संतोष वाकडे याने सहायक पोलिस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले होते.

Mahavikas Aghadi : लादलेला उमेदवार स्वीकारण्यास नकार !

समजूत तरी..

पोलिसांनी जमावाची समजूत काढली. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे पार्थिव चिखली ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली होती. याप्रकरणी भूषण गावंडे यांनी पोलीस स्टेशन अमडापुर येथे दिलेल्या तकारीवरून आरोपी विरुध्द भादंविचे कलम 353, 332, 341, 143, 147, 148, 149 व मुंबई पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश भोसले यांनी दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयात सादर केले होते.

या प्रकरणात अभियोग पक्षातर्फे फिर्यादी भुषण गावंडे, पोलिस कॉन्स्टेबल इदरसिंग जारवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूणा देशमुख व तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश भोसले यांचे साक्षी पुरावे नोंदविण्यात आले. ते एकमेकांशी सुसंगत असल्याने महत्वपुर्ण व विश्वासहार्य ठरले. त्या आधारे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही. व्ही. मुगळीकर यांनी आरोपी संतोष वाकडेला प्रत्येकी ३ महीने सश्रम कारावास व 6000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी एक महीना कारावास अशी शिक्षा सुनावली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!