राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांना भरती तर काहींना गळती लागलेली आहे. अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे फुटली. त्यावेळी अनेकांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना साथ देत त्यांच्या गटात सामील होण्याचा सपाटा संपूर्ण राज्याने बघितला. आता समीकरणं बदलली आहेत. आणि शरद पवारांच्या गळाला भाजपचा नेता लागलेला आहे. लकरच या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सध्या अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखल्याचं दिसत आहे. कोल्हापुरातील समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता पुण्यात देखील भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गणेशोत्सवातील एका कार्यक्रमात त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
पक्ष बदलाची हवा
पुण्यातील वडगाव शेरीमध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. अजित पवार सध्या भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे विधानसभेला ही जागा त्यांच्याकडेच जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपला ही जागा मिळेल की नाही, याबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही. वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. यामुळेच बापूसाहेब पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
इतकंच नाही तर, ‘तुतारी’च आपलं चिन्ह असल्याचं जाहीर करत त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. पठारे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे सध्या भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. अजित पवार गट भाजपसोबत गेला. अजित पवार गटाचे सुनील टिंगरे वडगाव शेरीचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. त्यामुळे पठारे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून मोठा धक्का बसला. शाहू महाराजांच्या घराण्याचे वंशज, भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. अशात बापूसाहेब पठारे यांच्या नावाने भाजपला पुन्हा एकदा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.