महाराष्ट्र

Ashish Shelar : इतरांच्या घरात घुसण्याची तुमची सवय 

BJP Politics : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच गणेशोत्सवाची परंपरा खंडित झाली होती 

 Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही लालबागच्या राजाची परंपरा खंडित केली. सार्वजनिक गणेशोत्सव रोखलात, गणेशभक्त आणि गणपती बाप्पाची ताटातूट केली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गणेशभक्त आणि लालबागच्या राजाची पायावर नाक घासून माफी मागावी, अशा शब्दांत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांचे विधान हास्यस्पद

आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊत यांनी स्वतःच्या अज्ञानाचा सार्वजनिक कार्यक्रम करणे आता बंद केला पाहिजे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांच्यावर टीका करताना जीभ खूपच वळवली, हे महाराष्ट्र बघतोय. खऱ्या अर्थाने अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री नव्हते, किंबहुना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही नव्हते. तेव्हापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला सातत्याने येत आहेत. संजय राऊत आज म्हणतात की, लालबागचा राजा कोण कुठे पळवेल किंवा कोण कुठे गुजरातला घेऊन जाईल, असे राऊत यांनी केलेले विधान हास्यास्पद असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

परंपरा पहिल्यांदा खंडित

राऊत यांच्यावर निशाणा साधून आशिष शेलार पुढे म्हणाले की, श्रीमान संजय राऊत कदाचित विसरले असतील. तुमच्याच पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सव्वाशे वर्षाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पहिल्यांदा खंडित झाली होती. लालबागचा राजा सुद्धा बसला नव्हता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लालबागचा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या आमच्या भाविकांची आणि बाप्पाची ताटातूट झाली होती. गणेशोत्सव मंडळाला टाळं लावण्याचा हेतू हा उद्धव ठाकरे आणि तुमच्या शिवसेनेचाच होता. हे कदाचित आज तुम्ही विसरला असणार. म्हणून तुम्हाला आठवण करून देतो. त्यावरचा राग महाराष्ट्रातल्या जनतेचा अजून ही गेलेला नाही. जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची लढाई न्यायालयात लढायची वेळ आली तेव्हा तुम्ही पाठ दाखविली होती. आम्ही ही लढाई न्यायालयात ही लढलो होतो.

Congress : फडणवीस म्हणतात, ‘महाराष्ट्र नंबर वन’

घरात घुसण्याची सवय

संजय राऊत म्हणाले होते की, शरद पवार यांच्या डोक्यात काय चालतय, हे समजायला देवेंद्र फडणवीस यांना 100 वर्षे लागतील. परंतु राऊत यांना आम्ही सांगतो की, कोणाच्या डोक्यात काय चाललंय आणि कोणाच्या घरात काय चाललंय ? याच्यात घुसण्याची सवय ही तुमची आहे.

एक कार्यकर्ता, स्वयंसेवक, नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामे अख्ख्या महाराष्ट्राला पुढची कित्येक वर्षे पुढे नेणाऱ्या गतीचं काम आहे. तर कोणाच्या डोक्यात काय चाललंय बघण्याची वृत्ती ही आमची नाही आणि भाजपचीही नाही. दुसऱ्यांच्या घरात झाकणं ही तुमची सवय आहे, असा घणाघात आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केला. 

error: Content is protected !!