महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : पोरीला अन् जावयाला नदीत फेका म्हणणाऱ्याबाबत काय बोलावं ?

Mahayuti Government : आता एकमेकांचे कपडे फाडू नये, म्हणजे झालं !

Political War : महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नाही, हे उघडपणे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्यासाठी त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. हमरी तुमरी करून काही लोक कॅबिनेटमध्ये आले. पण आता त्यांचे काही जमत नाही. शाब्दिक वादापर्यंत ठीक आहे. पण यांनी आता एकमेकांचे कपडे फाडु नये, म्हणजे झालं, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. 

खुर्चीसाठी काही पण का..

नागपुरात शनिवारी (ता. 7) वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अजित पवारांना पक्ष फोडण्यापूर्वी सद्बुद्धी आली असती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. भाजपने प्रत्येक घरात भांडणं लावण्याचे काम केले. धर्मराव बाबा आत्राम यांच्याबद्दल विचारले असता, माझ्या जावयाला आणि पोरीला नदीत फेका, असं ते म्हणतात. ते खुर्चीसाठी या स्तराला गेले आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलावं?

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते कलीयुगातील अभिमन्यू आहेत. सुटणार कसे? अभिमन्यू सतीयुगात सुटला नाही, आताही सुटणार नाही. आधुनिक युगात वेगळे अभिमन्यु तयार होत आहेत. पण त्याला संपवण्यासाठी रिमोटची गरज नाही. पक्षातील रिमोट त्यांना त्रस्त करताना दिसत आहे.

खोटेच टेंडर..

पैश्याचा बळावर जागा जिंकू असे त्यांना वाटते. पण महाराष्ट्रात ते शक्य नाही. आतातरी टेंडर थांबवावे. व्यापाऱ्यांना गब्बर करण्याचे काम सुरू आहे. जागा दिसली की हडप करण्याचे काम सध्या सुरू आहे. बिल्डर आणि उद्योगपतींच्या घरात घुसण्याचे काम ते करत आहेत. पैश्याचा भरवश्यावर निवडणुका जिंकू पाहात आहेत. पण त्यांच्या हातात काही लागणार नाही. महायुतीला लोक हद्दपार करतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

सानंदा मायक्रोन टेक्निलॉजी, सनद गुजरात, सीजी पावर, डोलेरा सेमिकंडकटर युनिट उद्योग बाहेर गेले आहेत. सत्तेची खुर्ची उगवत आहे अन् उद्योग बाहेर जात आहेत. शेतकऱ्यांच्या वारसांना निधी बंद केला होता. आम्ही दबाव टाकल्यावर निर्णय रद्द करून तो सुरू करण्यात आला. आदिवासी विद्यापीठ गडचिरोलीत होणे अपेक्षित आहे. असे असताना ते नाशिकमध्ये करण्याचा निर्णय घेतला, त्याचा आम्ही निषेध करतो.नाशिकसारख्या शहरात आणून त्याचा उपयोग काय? गडचिरोलीत आले तर त्याचा फायदा होईल.

Congress : फडणवीस म्हणतात, ‘महाराष्ट्र नंबर वन’

स्वाभिमान विकला जातो 

महाज्योतीचे मुख्य कार्यालय नागपुरात असताना ट्रेनिंग सेंटर पुण्यात आहे. याचा काय उपयोग होणार, असा प्रश्न करत ओबीसींची मते त्यांना पाहिजेत. पण मुळात ओबीसीं सोबत त्यांना देणं घेणं नाही. इन्फ्रास्ट्रक्चच्या नावावाखाली सरकारचे दावे तकलादू आहेत. हिंमत असेल तर उद्योगमंत्र्यांनी आठ दिवसांत श्वेत पत्रिका काढावी. गुजरातचरणी पाय पडत स्वाभिमान विकला जात आहे.

लुटारू सरकारला दूर करा

गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पा विघनहर्ता आहेत. हे संकट टळून सुगीचे आनंदाचे, मानवतेचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना करतो. विघ्नहर्त्याला नमन करून लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकार घालवण्याची प्रार्थना करतो. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी, अशीही प्रार्थना करतो, असे म्हणत पुढच्या दोन महिन्यांनी अरिष्ट संकट दूर होऊन महाराष्ट्र नव्याने उभारी घेईल, अशीही अपेक्षा विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!