महाराष्ट्र

Nitesh Rane : फोटोला जोडे मारत तुडवले पायाखाली

Muslim Community : बुलढाण्यात नीतेश राणे विरोधात आक्रोश मोर्चा

Demand To Ban Public Meeting : रामगिरी महाराज यांच्यासंदर्भात विरोधात बोलले तर मशिदीत शिरून चून चून के मारेंगे, अशी थेट धमकीच नितेश राणेंनी काही दिवसांपूर्वी दिली होती. रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचनात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत राहावा. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोलले, कोणी मस्ती केली तर मशिदीत घुसून मारू, असे राणे म्हणाले होते. नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधकांसह मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे.

आक्षेपार्ह विधान

भाजपचे आमदार नितेश राणेंनी मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात बुलढाण्यात मुस्लिम समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणात काळे झेंडे हातात घेत मुस्लिम समाजाच्यावतीने आमदार नितेश राणे यांचा निषेध करण्यात आला. राणे यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारत पायाखाली तुडविण्यात आले.

दंगल घडविण्याचा कट

देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडविण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रयत्न करणाऱ्या नितेश राणेंना अटक करावी. हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना बंदी घालावी. पोलिसांचे मानसिक खच्चीकरण केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा. सामाजिक तेढ निर्माण करण्यापासून त्यांना रोखावे. घडविण्याचे षडयंत्र राणे रचत आहेत. मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या मशिदींमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देणे हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

FIR Registered : नितेश राणेंवर आणखी एक गुन्हा!

अटकेची मागणी

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन पाठविण्यात आले. नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी घोषणांमधून करण्यात आली. संविधान जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबादचे नारे देण्यात आलेत. बुलडाणा शहरातील इंदिरानगर भागातून निषेध आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. आरोग्यधाम, बस स्टॅन्ड, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक) जयस्तंभ चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मन्सूर सहाब इमाम, ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, हापिस मुजाहिद, मौलाना मुजीब यांनी मोर्चाला संबोधित केले. सभेनंतर निवेदन देण्यात आले. यावेळी हाफीज रहमत खा, मुफ्ती जमीर , मौलाना समीर, समीर खान, मुफ्ती जमीर सिराजी, जयश्री शेळके, हर्षवर्धन सपकाळ, मोहम्मद सज्जाद, शेख समीर, डॉ. मोबीन, बबलू कुरेशी, जाकीर कुरेशी, जुनेद डोंगरे, दानिश अजहर, असलम शाह, नदीम शेख, साबिर अली, बिलाल डोंगरे, हरीश रावळ, रिजवान सौदागर आदी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!