प्रशासन

ST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ, संपावर कर्मचारी ठाम !

Maharashtra Government : उद्याच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष 

Bus Strike : वेतनाच्या प्रमुख मागणीसह आंदोलनावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून अखेर राज्यभर संप पुकारण्यात आला आहे. 3 सप्टेंबर रोजी राज्यातील 90 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाल्याने ‘लालपरी’ ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे 3 सप्टेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत कृती समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने अखेर ही बैठक निष्फळ ठरली आहे. 

बस सेवा कोलमडली

एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यातील एसटी बस सेवा पूर्णतः कोलमडली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही वेतन लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. आज हजारो प्रवाशी एसटी बस स्थानकावर अडकले होते. मिळेल त्या वाहनाने प्रवाशी आपल्या गावाला गेले.

ऐन सणासुदीच्या काळात लालपरीची चाके ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचारी मंगळवारी (ता. 3) रात्री बारा वाजेपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी संप करु नये, असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

Eknath Shinde : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार?

तातडीची बैठक 

एसटी कर्मचाऱ्यांची 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. पण त्याआधी 3 सप्टेंबर रोजी मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याबाबतचं आवाहन केलं. पण कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसोबतची सरकारची ही बैठक निष्फळ ठरली आहे.

विनंती ..पण

मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करण्यासाठी आज बैठक बोलावली होती. ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय व्हायला नको म्हणून त्यांनी संप मागे घेण्याची त्यांनी विनंती केली. मात्र एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्यास आग्रही आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचारी कृती समितीची 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघतो का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या आहेत प्रमुख मागण्या..

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडे भत्ता मिळावा आणि एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजार रुपयांची वेतनवाढ मिळावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!