महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue : आंदोलनाचे उत्तर आंदोलनातून!

Akola : महाविकास आघाडीला भाजपकडून प्रत्युत्तर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले जात आहे. विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांविरोधात जोडे मारो आंदोलन केले. तर याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही राज्यव्यापी आंदोलन करीत महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले आहे. अकोल्यात रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपकडून मौन आंदोलन करण्यात आलं. राज्यातही ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात आलं आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असताना यावरुन राज्यामध्ये राजकारण सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन केले. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही राज्यव्यापी आंदोलन केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडायला तयार नाही. त्यामुळे सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभर संताप पाहायला मिळत आहे. तर शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये सखोल चौकशी होण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असे हे आंदोलन करण्यात येत आहे.

अकोल्यासह राज्यभर भाजपचे आंदोलन!

मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही बाब दुर्दैवी आहे. मात्र यावर महाविकास आघाडी महाराजांच्या नावाने गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याचविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. महाविकास आघाडीच्या विरोधात आज भारतीय जनता पक्ष अकोलाच्या वतीने शिवाजी पार्क येथे श्री छत्रपतींच्या स्मारकासमोर मौन पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर,भाजपा जिल्हाअध्यक्ष किशोर मांगटे पाटिल, संजय गोटफडे, देवशिष काकड, रमेश अलकारी कृष्णाजी शर्मा, माधव मानकर, दिलीप मिश्रा,राजेंद्र गिरी, संतोष पांडे, उमेश गुजर ,पवन महल्ले इत्यादी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपुरातही आंदोलन!

महाविकास आघाडीच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सहभाग घेत महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर घाणाघात केला आहे. नागपूरच्या महाल येथील शिवतीर्थ परिसरात चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले. आणि मविआच्या जोडे मारो आंदोलनाच्या विरोधात भाजपनं खेटरं मारो आंदोलन पुकारलं. बदमाशी करणाऱ्या मविआला आम्ही खेटरं मारत असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!