महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : काल रामगिरीवर काय ठरलं, बावनकुळेंनी सर्वच सांगितलं !

CM House : यानंतर भाजपचा कुणीही महायुतीतील नेत्यांच्या विरोधात वक्तव्य करणार नाही !

Nagpur Politis : ‘लाडकी बहीण योजना टप्पा – 2’ कार्यक्रम रेशीमबागेत पार पडल्यानंतर रात्री रामगिरीवर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीतील नेत्यांची बैठक झाली. यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत काय चर्चा झाली, हे रविवारी (ता. 1) भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

 

भाजप तर्फे आंदोलन

महाविकास आघाडीच्या ‘जोडे मारो आंदोलन’च्या विरोधात भाजयुमोने आज प्रतिआंदोलन केले. यावेळी आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, यानंतर महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाबद्दल विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्य भाजपच्या राज्यभरातील कुणीही पदाधिकारी करणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. याचा फायदा विरोधक वेगळ्या पद्धतीने घेतात. त्यामुळे प्रत्येकाला तशा सूचना दिल्या आहेत.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत प्रफुल पटेल, सुनीत तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. गत वर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जे विकास कामे चर्चेला आले होते, ते मार्गी लावण्याबाबत चर्चा या बैठकीत चर्चा झाल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. ही कामे लवकरात लवकर करण्यासाठी महायुती सरकार ठोस पावले उचलणार आहे.

विधानसभेची तयारी

कोण कुठे लढणार, कुणाला किती जागा मिळणार, याबद्दल विचारले असता, अद्याप काहीही ठरलेलं नाही. कारण तो मोठा प्रश्न नाहीये. जेथे जो जिंकणार असेल, त्याला ती जागा दिली जाईल. आणि ती जागा निवडून आणण्यासाठी महायुती एकत्रितपणे प्रयत्न करेल. 10 सप्टेबरपर्यंत जागावाटबाबत सर्व काही क्लिअर होणार आहे. महायुतीचे प्रमुख नेते यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबी स्पष्ट करतील. यामध्ये मित्रपक्षांचाही विचार केला जाणार आहे.

महाराष्ट्रात भाजयुमोच्यावतीने आंदोलन सुरू झाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हेआंदोलन आम्ही सुरू केले. शिवाजी महाराज आम्हा सर्वांसाठी वंदनीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्यांनीही तमाम जनतेची माफी मागितली. त्यानंतरही महाविकास आघाडीचे नेते केवळ राजकारणासाठी त्या घटनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पंडित नेहरूंच्या पुस्तकात त्यांनी शिवाजी महाराजांना दरोडेखोर, लुटारू म्हटलं आहे. याचं उत्तर नाना पटोले देतील का? मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री असताना छिंडवाड्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला. याचं उत्तर नाना पटोले देतील का, असे प्रश्न आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!