Zp school : बदलापूरची घटना ताजी असतानाच आता गोंदियमध्ये शिक्षकाने विकृतीचा कहर केला आहे. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवून लज्जास्पद कृत्य केलं. हा धक्कादायक प्रकार पुढे येताच आरोपीविरोधात तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या शिक्षकाचं निलंबन देखील करण्यात आलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकानं आपल्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. त्याने तिच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवल्या. तसेच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या मुलीच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरोधात तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
50 वर्षांचा विकृत
पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 22 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर ती आपल्या घरी गेली, त्यानंतर तिच्या शाळेतील 50 वर्षांचा विकृत शिक्षक उमेश टीकाराम मेश्राम तिच्या घरी आला. त्याने या मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवली. मुलीने व्हिडीओ क्लिप पाहाण्यास नकार देताच त्याने पीडितेचे केस धरून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
Bhandara – Gondia : ‘उत्कृष्ट आमदार’ परीक्षेत भंडारा-गोंदिया नापास!
हे चाललंय काय?
पाहिले कोलकाता, नंतर बदलापूर, अकोला आणि आता गोंदिया. विकृतीचा कळस बघायला लावणाऱ्या घटना घडल्या. समाजमन हेलावून गेलं आहे. अकोल्यात एका शिक्षकाने 8व्या वर्गातील मुलींसोबत असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. तर बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला. या घटनांनी राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना आता गोंदियात आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. पण इतर घटनांमुळे पसरलेला संताप बघता अद्याप विकृत वृत्तीने धडा घेतलेला नाही, हेच यातून सिध्द होते.