महाराष्ट्र

Nagpur : गडकरी म्हणाले, ‘हा तर निर्लज्यतेचा कहर आहे’

Nitin Gadkari : प्रशासनाला धरले धारेवर; 'जनता ओरडते तेव्हा अधिकारी हसत असतात'

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासचा कठोर भाषेत समाचार घेत आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वी त्यांनी शहरातील समस्या दूर करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिले होते. आज एका कार्यक्रमात तर त्यांनी ‘निर्लज्यतेचा कहर आहे’ या भाषेत प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘स्थानिक स्वराज्य संस्था दिवस’, तसेच नागपूर केंद्राचा रौप्य महोत्सवी सोहळा शनिवारी (दि.३१) आयोजित करण्यात आला. रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. रामदास आंबटकर, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक नागेश शिंगणे आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

गडकरी म्हणाले, ‘नगरपरिषद आणि महापालिकांमध्ये खूप समस्या आहेत. खरं तर जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी देणे, सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, रस्ते उत्तम ठेवणे, रस्त्यांवर पाणी साचू नये याची काळजी घेणे या प्रशासनाच्या जबाबदाऱ्या आहेत. पण परिस्थिती नेमकी विपरित आहे. लोक त्रस्त आहेत. प्रशासनात खूप त्रुटी आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे परफॉर्मन्स ऑडिट आवश्यक आहे. कारण एकीकडे लोक ओरडत राहतात आणि अधिकारी छान हसत राहतात. पैसा हा कामातील अडचण नाही. काम करण्याची वृत्तीच नाही, हीच मुख्य अडचण आहे.’

Maharashtra Politics : वाचाळवीरांना वेळीच आवरा

नंदीला हात जोडल्याशिवाय..

पावसाळ्यापूर्वी नाल्या वगैरे साफ केल्या क्या? असं मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना विचारलं. तर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. पावसाळ्यात नाल्या साफ होत नाही. लोक त्रस्त आहेत. पण प्रशासन म्हणजे निर्लज्यतेचा कहर आहे. जनता ओरडत राहते, वर्तमानपत्र छापत असतात आणि अधिकारी निर्गुण निराकार बघत राहतात, असे गडकरी म्हणाले. रस्ते बनविणे स्वस्त काम नाही. प्रचंड खर्चाचे काम आहे. कारण तिथे नंदीला हात जोडल्याशिवाय फाईल वर पोहोचत नाही, अशी खोचक टीका गडकरींनी केली.

लँड रेकॉर्डवाले सर्वांत मोठे बदमाश

गडकरींची गाडी आज सुसाट होती. त्यांनी सरकारमधील जवळपास सर्व विभागांना धारेवर धरले. विशेषतः जनतेचा थेट संपर्क ज्या विभागांसोबत येतो, त्या विभागांचा तर जोरदार समाचार घेतला. ‘पाण्याचे मीटर नसल्यामुळे नागपुरात चोवीस बाय सात योजना आणली. नाहीतर पाण्याची चोरी व्हायची. दुसरीकडे ते लँड रेकॉर्डवाले तर सर्वांत बदमाश आहेत. ते तर नकाशाच लवकर मंजूर करत नाहीत,’ असे गडकरी म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!