Hingoli Crime : तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात ही घटना घडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली. राज्यात कणा नसलेले सरकार आहे. कायदा व सुव्यवस्था नाही हे सिद्ध होत आहे. हे बिनकामाचे सरकार आहे, अशी बोचारी टीका पाटील यांनी आपल्या एक्स हॅन्डलवरून केली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तलाठ्याची हत्या झाली आहे. राज्यातील महिला, मुली, सामान्य नागरिक सुरक्षित नव्हताच. पण आता राज्यातील सरकारचे अधिकारी, कर्मचारीही सुरक्षित नाहीत. दररोज घडणाऱ्या घटना पाहता राज्यात कणा नसलेले सरकार आहे, हेच सिद्ध होते. याआधी आम्ही उत्तर प्रदेश, बिहारमध्ये असे प्रकार घडतात असे ऐकत होतो. मात्र आता महाराष्ट्रातही असे प्रकार घडत आहेत, हे पाहून वेदना होतात, असे पाटील म्हणाले.
राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण गाजत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात व्हॉट्सअॅपवर झालेल्या संवादावरून थेट तालाठ्याचाच चाकूने भोसकून खून केल्याची घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथील तलाठी कार्यालयातच हा खून झाली आहे. शेतीविषयक कागदपत्रासाठी आलेल्या एका तरुणाने डोळ्यात मिरची पूड टाकत तलाठ्याचा भोसकले. 28 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना. जखमी तलाठ्याचा परभणी येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
चॅटिंगचे कारण
व्हॉट्सअॅप चॅटवरुन वादाला सुरुवात झाली. त्यानंतर हत्येची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. संतोष पवार असे हत्या करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या घटनेने महाराष्ट्रातील महसूल विभाग हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रताप कराळे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार हे त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत होते. त्यावेळी प्रताप कराळे हा कार्यालयात आला. त्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजवरुन तलाठी पवार यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तलाठी पवार यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मॅसेज टाकले आहे, असे प्रत्युत्तर दिले.
Kidnapping Case : डॉक्टरांना कोंडून ठेवल्याप्रकरणी शिवसैनिक निर्दोष
त्यानंतर प्रताप कराळेने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड फेकली. त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यानंतर आरोपी कराळेने घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी संतोष कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना त्रास देत होता. तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून देणार, असे तो म्हणायचा. असे करता येत नाही असे वारंवार सांगूनही संतोष ऐकत नव्हता. जमिनीच्या प्रकरणावरून त्यांचा वाद सुरू होता. त्यातच प्रतापने पवार यांचा खून केला. भरदिवसा सरकारी कार्यालयात चाकूने हल्ला झाल्याने सारेच घाबरले आहेत. तलाठ्याचा केवळ संशयावरून खून केल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे . याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.