प्रशासन

IAS Transfer : राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Assembly Election : निवडणुकीपूर्वी प्रशासनात मोठे फेरबदल

Departmental Change : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सरकारने काढले आहेत. यात जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचे स्थान परिवर्तन करण्यात येत आहे. यापूर्वी गृह विभागाने अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश काढले. आता आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत आहे.

सोमवारी (ता. 26) काढण्यात आलेल्या आदेशानुसार प्रदीप पी. यांची मुंबईच्या खादी ग्रामोद्योग मंडळात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वसुमना पंत या रेशीम शेती विभागाच्या संचालक होत्या. त्या आता नागपूरच्या (Nagpur) वनामतीच्या संचालक असतील. वनामतीच्या विद्यमान संचालक मिताली सेठी या नंदूरबारच्या नव्या जिल्हाधिकारी असतील. नाशिकच्या कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांना नांदेडच्या कंधार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर पाठविण्यात आले आहे. प्रियमवदा म्हाडदळकर या अमरावती मधील धारणीच्या सहाय्यक जिल्हाधिकारी असतील.

आणखी अधिकाऱ्यांचा समावेश

अर्पित चौहान यांची बदली नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. नमन गोयल हे गडचिरोलीतील (Gadchiroli) एटापल्लीचे नवे सहाय्यक जिल्हाधिकारी असतील. भामरागडच्या आदिवासी प्रकल्पाचे ते संचालकही असतील. अनय नावंदर यांना नंदूरबार जिल्ह्यातील तळोदाचे सहाय्यक जिल्हाधिकारी असतील. चमेली यांना रत्नागिरीतील राजापूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नेमणूक देण्यात आली आहे. अकुनुरी नरेश हे नाशिकच्या कळवण उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी असतील. अमित रंजन गडचिरोलीच्या चार्मोशीचे सहाय्यक जिल्हाधिकारी असणार आहेत.

Chandrapur MP : खासदारांच्या भावालाही लागले आमदारकीचे डोहाळे !

अंजली शर्मा यांना नंदूरबार येथे सहायक जिल्हाधिकारी पदावर पाठविण्यात आले आहे. चंद्रपूरच्या (Chandrapur) गोंडपिपरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अपूर्व बसूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. ओंकार पवार हे नाशिकच्या इगतपुरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी असतील. जेनिथ चंद्रा डोनथुला यांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर पाठविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडाचे नवे सहाय्यक जिल्हाधिकारी (Assistant Collector) रणजित मोहन यादव असतील. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील उपविभागात कुशल जैन यांना सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नेमणूक देण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेनंतर राज्यातील जिल्हाधिकारी, सचिव, प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बदली आदेश निघतील असे सांगण्यात येत आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यातील सर्व बदली प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सरकारनचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार बदली आदेशांचे चक्र वेगाने फिरत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!