महाराष्ट्र

Raj Thackeray : जय मालोकारच्या परिवाराची घेतली भेट

Akola MNS : आमदार मिटकरींच्या वाहनावर हल्ल्यानंतर झाला होता मृत्यू

Jay Malokar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर निधन झालेले मनसेचे पदाधिकारी जय मालोकार याच्या परिवाराची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली. राज ठाकरे रविवारी (ता. 25) अकोल्यात आले होते. मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राज यांनी जय मालोकार याच्या गावात जात मालेकार परिवाराची भेट घेतली. जयच्या निधनानंतर मनसेचे युवानेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे अकोल्यात आले होते. त्यांनी मनसे मालोकार परिवाराच्या पाठिशी असल्याचा शब्द दिला होता. राज ठाकरे यांनी देखील हाच धीर मालोकार परिवाराला दिला.

गेल्या महिन्यात 31 जुलैला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या घटनेनंतर जय मालोकार या मनसे पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला मृत्यू होता. मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलाच वाद यावेळी रंगला होता. मात्र या वादानंतर अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाकी पडले होते. मिटकरी यांना अजित पवारांनी साथ दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे किंवा पक्षातील एकाही आमदाराने मिटकरी यांच्याकडे ढुंकुनही पाहिले नाही. त्यामुळे काही दिवस आराडाओरडा केल्यानंतर मिटकरी आपोआपच शांत झालेत. या सर्व घडामोडीत राज यांनी मालोकार परिवाराची भेट घेतली.

घातपाताचा संशय

राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी त्यांचे कर्तव्य पूर्ण केले. मात्र आपल्या घरातील जीव गेला आहे. त्यादिवशी गेला. तसा वापसच आला नाही. अॅटॅक आला असता तर रिपोर्टमध्ये तसे आले असते. रिपोर्टमध्ये तसे काहीच नाही. त्याच्यासोबत काय घडलं हे आम्हालाच माहिती नाही. त्याच्यासोबत घातपात झाला आहे, अशी प्रतिक्रिया जयच्या आईने व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या आधी जय मालोकार यांच्या कुटुंबियांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी 1 ऑगस्टला त्यांच्या निंबी मालोकार गावात जात भेट घेतली होती. जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष होता. परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षामध्ये तो शिक्षण घेत होता. जय मालोकार अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास होता. गेल्या पाच वर्षांपासून मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत होता.

Narendra Modi : महिलांवरील अत्याचाराविरोधात कडक कायदा

जय मालोकारच्या मृत्युला आता जवळपास एक महिना लोटला आहे. मात्र मालोकार परिवार अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाही. ज्या व्यक्तीमुळे हा प्रकार घडला आणि आपला मुलाने जीव गमावला ते तर शालिशान बंगल्यात एसीची हवा खात बसले आहेत. पोटचा गोळा जर आपला गेला, असा जयच्या आईचा आक्रोश आजही कायम आहे. जयच्या मृत्युमागील खरे कारण समोर आले पाहिजे, अशी त्या माऊलीची आजही मागणी आहे. हिच मागणी जयच्या आईने राज ठाकरे यांच्याकडे केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!