महाराष्ट्र

Eknath Shinde : लाडकी बहीण योजना अव्याहत राहणार

Chief Minister : विरोधकांचे कारनामे फेल झाल्याचा दावा

Word Given Again : लाडकी बहीण योजना आल्यापासून विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव दिसत आहे. त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणींबाबत अपप्रचार केला. विरोधी पक्ष नेत्यांनी पुरेपूर कटकारस्थान रचले. परंतु महायुतीने ही योजना पूर्ण करून दाखविली. महिलांच्या खात्यात आता पैसे जमा होत आहेत. ही योजना बंद होणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत शिंदे बोलत होते.

विरोधकांकडून पसरविण्यात येत असलेल्या अफवांकडे दुर्लक्ष करा. राज्यातील दीड कोटी बहिणींनी योजनेचा फॉर्म भरला आहे. खऱ्या अर्थाने योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार काम करत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक वर्षासाठी तरतूद केली आहे. त्यामुळे कोणीही शंका घेण्याचं कारण नाही. महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. याचं समाधान सरकारला आहे. अनेक शंका विरोधकांनी उपस्थित केल्या. सर्व बहिणींनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे शिंदे म्हणाले.

अत्याचाराचा निषेध

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) सुद्धा अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. ठाण्यातील बदलापूर येथे शालेय बालिकांवर अत्याचार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, दोषीं पैकी कोणालाही सोडलं जाणार नाही. कोणीही गुन्हेगार असला, तरी त्याला शिक्षा केली जाईल. सर्व प्रकरणांची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे. कोल्हापूरमध्ये बिहारच्या एका कुटुंबातील मुलगी तिच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे बाहेर पडली. मुलगी सापडत नसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी रात्री शोध घेतला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह सापडला. लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय यात आहे.

Sexual Assault Cases : महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक

पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काही संशयितांना पकडण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पीडित परिवाराला योग्य ती मदत केली जाईल, असेही शिंदे यावेळी म्हणाले. पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले. महायुती सरकारच्या (Mahayuti Government) कार्यकाळात महिला अधिक सुरक्षित आहेत. महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध असल्याचे प्रतिपादनही शिंदे यांनी केले. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकार आणखी व्यापक प्रयत्न करेल, असेही शिंदे यांनी सांगितले. महिलांनी विरोधकांच्या अपप्रचाराला भीक घालू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!