महाराष्ट्र

Students Agitation : आंदोलनानंतर एमपीएससीने दिली ‘ही’ माहिती!

MPSC : विद्यार्थ्यांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर असल्याने गेल्या तीन दिवसांपासून पुणे येथे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. आक्रमक पध्दतीने विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची आता एमपीएससीने दखल घेतली आहे. यावर एमपीएससी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एमपीएससीने तातडीने बैठक बोलावली आहे. आज (गुरुवार) ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता या बैठकीत काय होतं, नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाविरोधात गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विरोधकांनीही या आंदोलनावरून सरकारवर आरोप केले आहेत. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर मोठा पेच निर्माण झाला. यासंदर्भात सरकारदरबारी वारंवार मागणी करून देखील त्याची पुरेशी दखल घेतली गेली नाहीय अखेर हे परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे.

तर शरद पवार हे आंदोलनात!

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सरकारला आणि एमपीएससीला इशारा दिला आहे. आज निर्णय न झाल्यास शरद पवार यांनीही आंदोलनात सामील होण्याचा इशारा दिला आहे. यात आज एमपीएससीची सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा एकाच दिवशी पेपर आल्याने यातील एका पेपरची तारीख बदलण्यात यावी.

कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट कराव्यात, या मागणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी झाले आहेत. तर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर रस्त्यावर उतरत या विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा शरद पवार यांनीही दिला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या एमपीएससी आयोगाच्या बैठकीत काय घडतं? काय निर्णय होतो? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

एमपीएससीचं ट्विट काय?

विद्यार्थी आंदोलनावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक गुरुवार, दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे, असं ट्विट आयोगकडून करण्यात आलं आहे. आता या बैठकीत नेमकं काय घडत पाहावं लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!