Political War : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्याही निवडणुकीचा मुहूर्त ठरू शकला नाही. आयोगच तारीखेची घोषणा करतो की काय, असे वाटत होते. मात्र आता महाराष्ट्रात दिवाळीनंतर राजकीय आतिशबाजी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीला अवकाश असला तरी त्याचे पडघम मात्र ऐकू येत आहे. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार बिनधास्त दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला (Congress) मोठे यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आहे. चंद्रपुरात एकही विकासकाम न करणाऱ्या काँग्रेसला दिशाभूल आणि अप्रचाराच्या जोरावर विजय मिळाला. हा विजय काँग्रेसच्या लगेच अंगातही संचारला. एका खाण अधिकाराऱ्याला मारहाण करीत काँग्रेसने आपले करे रूप दाखवून दिले. शात काँग्रेस आता विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून अनेक जणांना भावी आमदार म्हणून स्वप्न पडू लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी झाली आहे. काँग्रेसमध्येच अशा भावी आमदारांची यादी मोठी आहे.
शिवसेनाही लागली कामाला
शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांना मातोश्रीवरून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे यांनीही जनसंपर्क वाढविला आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात त्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात सध्या व्यस्त आहेत . वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) माध्यमातून राजू झोडे हे सुद्धा निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. झोडे कोणता झेंडा हातात घेतात, याची उत्सुकता सर्वांना आहे. एका बाजुला महाविकास आघाडीमध्ये आमदार होण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. दुसऱ्या बाजुला महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आपल्या विकास कामांमध्ये व्यस्त आहेत.
भाजपने सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन ताकदीने जनसंपर्क कायम ठेवला आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळेलच, असे चित्र आहे. महाविकास आघाडीत बल्लारपूरच्या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. अशात मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांचा व्याप पाहता त्यांचा विजय निश्चित दिसत आहे. मुनगंटीवार यांनी केलेली सर्वच विकास कामे दृष्य स्वरुपाची आहेत. प्रत्येक कामाचा पुरावा ते मतदारांपुढे सादर करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रचार करताना सगळ्यांची दमछाक होणार आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे सलग तीनदा निवडणूक जिंकले आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अर्थमंत्री, वनमंत्री , सांस्कृतिक कार्यमंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री पदावर व्यापक काम केले आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून त्यांचे चांगलेच वजन आहे. सरकार आणि विरोधी पक्षही त्यांचा सन्मान करते, हे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या संपूर्ण कायापालटामागे सुधीर मुनगंटीवार हेच आहेत. बॉटनिकल गार्डन, एपीजे अब्दुल कलाम गार्डन, पोंभुर्णा येथील तहसीलची इमारत, मुलचे रस्ते, बल्लारपूर बस स्टॅन्ड अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या कामाला तोड नाही, असेच मतदारसंघात बोलले जात आहे.