महाराष्ट्र

Badlapur Case : निषेधातील हिंसााचार पूर्वनियोजित होता का?

Police In Action : सोशल मीडियावरील ट्रेंडिंगनंतर तपासाला सुरुवात

Sexual Assault : बदलापूर येथील दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराची घटना संतापजनकच आहे. परंतु या घटनेनंतर झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग होता काय, याचा तपास आता पोलिस करणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या काही पोस्टच्या आधारे हिंसक घटना करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. काही महिल्यांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी एकापाठोपाठ जातीय दंगली झाल्या होत्या. त्यावेळी देखील काही सेकंदात या घटनांचे चिथावणीखोर व्हिडीओ सोशल माध्यमांवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आले होते. असाच प्रकार बदलापूरच्या घटनेमागे आहे काय, याचा तपास केला जाणार आहे.

बालिकांवर अत्याचार झाल्यानंतर शाळेच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. यासंदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. काहींनी आंदोलनस्थळी आधीपासून प्रिंट केलेले पोस्टर्सही आणले होते. या पोस्ट आणि पोस्टर्सची अवस्था पाहता हे एका रात्रीतून छापण्यात आले नाहीत, असा संशय निर्माण झाला आहे. अनेक पोस्टर्स व्यवस्थित फ्रेम करून आणण्यात आले होते. बहुतांश पोस्टर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका करणारेच होते. बदलापुरातील अत्याचार प्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणा केला. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र मंगळवारी (ता. 20) घडलेला एकूणच घटनाक्रम पाहता, आंदोलकांच्या आड काही समाजकंटक गर्दीत घुसल्याचा संशय पोलिसांना आहे.

ते’ सामान्य आंदोलक नसावे

बदलापूर हिंसक घटनेप्रकरणी आता पोलिसांनी सर्वंकष तपास सुरू केला आहे. एकूणच परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार आहे. पोलिसांवर दगडफेक करणारे, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बाटली भिरकावणारे हे सामान्य आंदोलक नसावे असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे मिळणाऱ्या फूटेजच्या आधारे आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बालिकांवरील अत्याचाऱ्याचा प्रकरणावरून राजकारण होत असल्याचे चित्र आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. सोशल माध्यमांवरही या घटनेचे राजकीय कनेक्शन जोडले जात आहेत. त्यामुळे बदलापूर घटनेमागील नेमके सूत्रधार शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्‍यांनी घेतली बदलापूर घटनेची गंभीर दखल !

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना आणि सत्ताधारी विरोधकांना डिवचण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. बदलापूरमधील हिंसक घटनेनंतरही अशा प्रकारची राजकीय विधाने समोर येत आहेत. मात्र राजकारणासाठी अशा संतापजनक आणि अमानवीय घटनांचा वापर करण्यात येऊ नये, अशा संतप्त प्रतिक्रियाही सोशल माध्यमांवर व्यक्त होत आहे. कोलकाता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अमानुष बलात्कार व हत्येनंतर सुरू झालेले सोशल मीडिया ट्रेंडिंग बदलापूरच्या घटनेमुळे आणखी वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक चिंतेत पडले आहेत. अशात पालक म्हणून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अभिनेता रीतेश देशमुख यांनी ट्विटवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिये मुळेही पालकांची चिंता खोलावली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!