Outstanding Service : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ देण्यात येणार आहे. या तीन अधिकाऱ्यांसह महाराष्ट्रातील 17 पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याना ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर करण्यात आले आहे. 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 59 पोलिसांचा सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सन्मान केला आहे.
पोलिस पदक प्रदान
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील एकूण 908 पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना ‘पोलिस पदक’ प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 59 पोलिसांचा समावेश आहे. यातील चिरंजीवी रामछाबिला प्रसाद हे अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) आहेत. गोवेकर हे सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) आहेत. पोलिस शौर्य पदकांमध्ये डॉ. कुणाल शंकर सोनावणे यांचाही समावेश आहे. सोनावणे हे उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) आहेत.
वाशिमच्या एसपींचा सन्मान
पोलिस उपनिरीक्षक दीपक आवटे, धनाजी तानाजी होनमाने (मरणोत्तर) यांनाही शौर्य पदक देण्यात येणार आहे. नाइक पोलिस शिपाई नागेश मदरबोईना, पोलिस शिपाई शकील युसुफ शेख, विश्वनाथ पेंदाम, विवेक नरोटे, मोरेश्वर पोटावी, कैलाश कुलमेथे, कोटला कोरामी, कोरके सन्नी वेलादी, महादेव वानखेडे यांनाही शौर्य पदक प्रदान केले जाणार आहे. विदर्भातील गडचिरोलीत यापूर्वी कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी अनुज तारे यांचाही शौर्य पदकाने सन्मान करण्यात येणार आहे. सध्या तारे हे वाशिम येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
IPS Transfer : माकणीकर, सागर, हसन, जैन, पानसरे, चिंता, बनसोड यांची बदली
पोलिस उपनिरीक्षक राहुल देव्हाडे, विजय सकपाळ, हेड कॉन्स्टेबल महेश मिच्छा, पोलिस नाइक समय्या आसाम यांचाही सन्मान मिळविणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 39 पोलिसांना पोलिस पदक प्रदान करण्यात येणार आहेत. पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) संदीप दिवाण, पोलिस सहआयुक्त (Joint Commissioner Of Police) विजय हातीसकर, पोलिस अधीक्षक संजय खांदे, उपअधीक्षक शिवाजी फडतरे, विनीत चौधरी यांनाही पदक प्रदान करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक (PSI) दत्तात्रय शिंदे, प्रकाश पांडुरंग गायकवाड, पोलिस निरीक्षक सदानंद राणे, उपअधीक्षक महेश तराडे, निरीक्षक राजेश भागवत, उपनिरीक्षक कृष्णराव तांदूळकर, राजेंद्र पाटील, संजय राणे, गोविंद शेवाळे, मधुकर नैताम यांचे नावही यादीत आहे.
अधिकाऱ्यांचा समावेश
पोलिस निरीक्षक अशोक होनमाने उपनिरीक्षक शशिकांत तटकरे, अक्षयवारनाथ शुक्ला, शिवाजी जुंदरे, सहाय्यक उनिरीक्षक (ASI) सुनिल हांडे, उपनिरीक्षक प्रकाश देशमुख, सहाय्यक उपनिरीक्षक दत्तू खुळे यांचाही सन्मान करण्यात येईल. रामदास पालशेतकर, सहाय्यक उपनिरीक्षक देविदास वाघ, प्रकाश वाघमारे, संजय पाटील, मोनिका थॉमस यांनाही पोलिस पदकासाठी निवडण्यात आले आहे. हेड कॉन्स्टेबल बंडू ठाकरे, गणेश भामरे, अरुण खैरे, दीपक टिल्लू, राजेश पैदलवार, श्रीकृष्ण हिरपूरकर, सहाय्यक कमांडंट, निरीक्षक राजू सुर्वे, संजीव धुमाळ, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल काळे, मोहन निखारे, द्वारकादास भांगे, अमितकुमार पांडे यांचाही पुरस्कार पटकाविणाऱ्यांमध्ये समावेश आहे.