महाराष्ट्र

Eknath shinde : उद्धवजी हे वागणं बरं नव्हं!

Shiv Sena : मुख्यमंत्री म्हणाले, ताफ्यावरील हल्ला 'ही’ कृतीची प्रतिक्रिया

Political war : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी उद्धव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांचे त्यांचं हे वागणं योग्य नव्हतं. राज यांच्या ताफ्यावर हल्ला व्हायला नको होता. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणालाच ते आवडलेले नाही. ही कारवाईची प्रतिक्रिया होती,’ अशी रोखठोक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

‘आमचे सरकार स्थापन झाल्यापासून या लोकांची भाषणे बघा कशी होत आहेत. सरकार एका महिन्यात पडेल, दोन महिन्यात पडेल, असा दावा करत आहेत. आता 2 वर्षे झाली. सरकार दिवसेंदिवस मजबूत होत आहे. कारण आम्ही आमचा उद्देश्य बाजुला ठेवला नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

राज ठाकरे स्टाईल उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचे वर्णन बीडमध्ये घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून केले. आवश्यक तेथे दुहेरी डोस देखील दिला जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणात असे होणे योग्य नाही. आगामी विधानसभा निवडणूक शांततेने लढवायची आहे, असे राज म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावरील हल्ल्याला त्यांनी मनसे कार्यकर्त्यांची संतप्त प्रतिक्रिया म्हटले आहे. आमच्याकडे कुणी बोट दाखवलं तर मनसे स्टाईलमध्ये ‘डबल’ प्रत्युत्तर देऊ. हे ठाण्यात दाखवून दिलं आहे, असं ते म्हणाले. राज ठाकरे यांनी आता कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

Vijay Wadettiwar : दोन ठाकरेंच्या वादामागे भाजपचे कारस्थान 

नेमकं काय घडलं होतं?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी दि. 10 ऑगस्टला संध्याकाळी ठाण्यात हल्ला झाला. याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. अविनाश यांच्यावर मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करून आंदोलन भडकवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोन स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत. यात एकूण 44 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते प्रितेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलू आणि मनोज चव्हाण यांना आरोपी करण्यात आले आहे.

या पूर्वी राज ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. यामुळेच राजकारण तापले आहे. आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी भावांमधील वाद निर्माण होण्यामध्ये शिंदे गट कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!