महाराष्ट्र

BJP Vs Congress : नागपुरात रंगले पोस्टर वॉर 

Nagpur Politics : काँग्रेस कार्यकर्त्यांचे गांधीगिरी आंदोलन

South West Constituency : नागपुरातील दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघांत सध्या काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय युद्धाला सुरुवात झाली आहे. नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपचा गड आहे. माझ्यापण येथे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपने पोस्टरबाजी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसने रविवारी (ता. 11) गांधीगिरी आंदोलन केले. त्यामुळे नागपूर आज सध्या भाजप विरुद्ध काँग्रेस असा राजकीय लढा सुरू झाला आहे.

विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने आंदोलनांना अधिक धार येत आहे. व्हीव्हीआयपी मतदारसंघ असल्याने दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघांत सध्या काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चरखा संघाच्या माध्यमातून आंदोलन केले आहे. महापालिका प्रशासनाच्या भेदभावपूर्ण कामाचा काँग्रेसने गांधीगिरी करत निषेध व्यक्त केला. पुढच्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने या मतदारसंघात काँग्रेसने आंदोलनाला सुरुवात केली आहे.

फलकांना विरोध 

भाजपाने या मतदारसंघात अनेक ठिकाणी सरकारने केलेल्या विकास कामांचा दावा करणारे फलक लावले. त्याला प्रत्युत्तर म्हणून व ही जनतेची दिशाभूल आहे,असा दावा करिता काँग्रेसने सरकारला प्रश्न विचारणारे फलक लावले आहेत. पोस्टर वॉर रोखण्यासाठी नागपूर महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून फलक निर्मूलन मोहिम राबविण्यात आली. काँग्रेसच्या फलकासोबत भाजपचेही फलक काढण्यात आले. मात्र काँग्रेसचे दहा आणि भाजपचे दोनच फलक काढण्यात आलेत. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी चांगले संतापले आहेत. महापालिकेच्या या कारवाई विरोधात काँग्रेसने रविवारी आंदोलन केले.

दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध चरख्यावर सूत कातून आंदोलन केले. प्रशासनातर्फे अवैध होर्डिंगविरुद्ध कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्त भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत. त्यामुळे त्रिमूर्ती नगर चौकात चरखा आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले होते. चरखा संघाची या आंदोलनासाठी मदत काँग्रेसने घेतली आहे. सत्यशोधक चरखा संघातर्फे मागील काही वर्षापासून महात्मा गांधी विचाराचा प्रचार आणि प्रसार केला जातो. त्यामुळे काँग्रेसने गांधीगिरी करीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वीही अशाच पद्धतीने काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी गोडसे प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले होते. हिंसेच्या विरुद्ध शांतीप्रियमार्गाने आंदोलन हाच पर्याय असल्याचा दावाही त्यांनी केला होता. प्रशासनाच्या भेदभावी विचाराच्या विरोधात महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत विरोध केल्याचे काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यावेळी म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!