महाराष्ट्र

Ravindra Waikar : नवी मुंबई विमानतळाला दि .बा.पाटील यांचे नाव द्या

Navi Mumbai Airport : खासदार रविंद्र वायकर यांची लोकसभेत मागणी; यापूर्वीही आलाय प्रस्ताव

Ravindra Waikar Demand : नवी मुंबई विमानतळ लवकर सुरू होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने केली होती. या विमानतळावरून पहिले ट्रायल उड्डाण येत्या ३१ अॉक्टोबरला होण्याची शक्यता आहे. अशात कोकणातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत यासंदर्भातील मागणी केली आहे.

मुंबई एअरपोर्टवरील विमांनांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे उभारण्यात स्वतंत्र एअरपोर्ट उभारले जात आहे. या विमानतळाला दि .बा.पाटील असे नाव देण्याची जनतेची मागणी आहे. ती मान्य करावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत केली. भारतीय आर्युमान विधेयक २०२४ वर बोलताना वायकर यांनी ही मागणी केली.

नवी मुंबई येथे नवीन एअरपोर्ट तयार करण्यात येत आहे. हे विमानतळ कधी पर्यंत तयार होणार याबाबतची स्पस्टता नाही. पण जनतेच्या मागणी नुसार या एअरपोर्टला दि .बा.पाटील नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. तो मंजूर करून एअरपोर्टला दि .बा.पाटील नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याचवेळी रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती केली.

पुनर्विकास शक्य

मुंबईतील सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या फक्त दोनच रनवे आहेत. ते ऐकमेकांना क्रॉस करतात, त्यामुळे विमान उड्डाण घेताना तसेच उतरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या विमानतळाला लागूनच झोपडपट्टी आहे. देशातील पायाभूत सुविधेसाठी केंद्र सरकारने ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद किली आहे. विविध शहरातील पायाभूत सुविधा तसेच गरीब, मध्यमवर्गीय यांच्या विकासाठी हा निधी ठेवण्यात आला आहे. या निधीपैकी १ लाख कोटी निधी देण्यात यावा. हा निधी प्राप्त झाल्यास येथील झोपडपट्टीचा शासनामार्फत पुनर्विकास करून या ठिकाणी अतिरिक्त रनवे तयार करणे शक्य होईल, असेही वायकर म्हणाले.

Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादींचा यात्रांचा मोसम!

कोण आहेत दि.बा. पाटील?

माजी खासदार, आमदार व पनवेलचे नगराध्यक्ष दिनकर बाळू पाटील (दि.बा. पाटील) हे उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. त्यांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. त्यांनी शेतकरी व कामगारांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. प्रसंगी कारागृहातही गेले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!