महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : ऑगस्टमध्येच सुरू होणार ओबीसी वसतिगृह

OBC Hostel : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

Facility For Students In Chandrapur : ओबीसी, एनटी ( भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह 17 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीची तत्काळ सोडविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात ओबीसी, एनटी ( भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. 

सामाजिक न्याय, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, अन्य वरिष्ठ अधिकारी आणि ओबीसी सेवा संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके, देवा पाचभाई, गोमती पाचभाई यांच्यासह प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळायला हव्या. शिक्षणासाठी सुयोग्य वातावरण त्यांना मिळायला हवे. त्यांच्या सोयीसुविधांकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यामुळेच विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था चांगली असावी. तत्काळ वसतिगृहातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वसतिगृहात विद्यार्थी प्रवेश सुरू करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अडवणूक होऊ नये

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन नाही. याबाबत विभागाच्यावतीने स्पष्ट कल्पना जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत पोहोचवावी. विद्यार्थ्यांना याबाबत अडचण येऊ नये, अशी स्पष्ट सूचना मुनगंटीवार यांनी दिली. कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी, एनटी ( भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधारच्या धर्तीवर आधार योजना सुरू करावी, ओबीसी विद्यार्थिनी प्रमाणे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात 100 टक्के सवलत मिळावी, विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती मिळण्याबाबत विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.

Sudhir Mungantiwar : विरोधी पक्षातील नेत्यांचेही मन जिंकले

अनुसूचित जातीसाठी असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात ओबीसी विद्यार्थ्यांचा कोटा कमी करण्यात आलेला नाही. याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम तत्काळ दूर करणे गरजेचे आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या सर्वच योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिराती व सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहिम राबवावी, अशी सूचनाही मुनगंटीवार यांनी केली. अतुल सावे म्हणाले की, चंद्रपूर येथील वसतिगृहात फर्निचरसह सर्व सुविधा उपलब्ध होतील. 17 ऑगस्टपूर्वी वसतिगृह सुसज्ज केले जाईल. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृहातही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने जे धोरणात्मक निर्णय आहेत, ते उच्चस्तर समिती आणि मंत्रिमंडळासमोर आणून त्यासाठी मंजुरी घेतली जाईल,असे सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!