पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक जवळपास निश्चित झालं होतं. दुर्दैवाने भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक देऊनही वजनाच्या मुद्यावरून अपात्र ठरली. पण तिने उपांत्य फेरी जिंकल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. यात राहुल गांधी यांनी केलेली खास पोस्ट विशेष चर्चेत राहिली.
उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत विनेश फोगटचे अभिनंदन केले. गेल्या वर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधातील आंदोलनाचे तिने नेतृत्व केले होते. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या विरोधात तिचे हे आंदोलन होते.
विनेश फोगाटला अंतिम फेरीत अपात्र ठरविण्यात आले असले तरीही उपांत्य फेरीतील विजयाने संपूर्ण देशात उत्साह आहे. सर्व जण तिला शुभेच्छा देत आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तिला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया एक्सवर त्यांनी विनेशसाठी एक खास पोस्ट केलीय. “एकाच दिवशी जगातील तीन अव्वल कुस्तीपटूंना हरवल्यानंतर विनेशसोबत आज पूर्ण देश भावुक आहे. ज्यांनी विनेश आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष नाकारला. त्यांचा हेतू आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं, त्या सर्वांना आज उत्तर मिळालय” असं राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आज भारताच्या शूर, हिम्मतवान मुलीसमोर सत्तेच पूर्ण तंत्र कोलमडून पडलय. चॅम्पियन्सची हीच ओळख असते. ते आपलं उत्तर मैदानात देतात. तुला खूप शुभेच्छा विनेश. पॅरिसमधल्या तुझ्या यशाचा प्रतिध्वनी दिल्लीमध्ये स्पष्ट ऐकू येतोय” असं राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलय.
तिच्याच देशात लाथेने चिरडण्यात आले
विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमधील उपांत्यपूर्व फेरीत माजी युरोपियन चॅम्पियन आणि २०१८ वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती लिवाचला ७-५ ने पराभूत केले. यानंतर बजरंग पुनिया ने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले, ‘विनेशच्या विजयावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे मला समजत नाही. आपण आनंदी आहोत की रडत आहोत हे सांगता येत नाहीय. ‘विनेश, तू खरोखरच विक्रम करण्यासाठी जन्माला आली आहेस. इतक्या अडचणींचा सामना करूनही तुझी नजर ध्येयाकडेच असते. हे सुवर्णपदक भारतात यावे हीच आमची प्रार्थना आहे.
भारताची वाघीण
बजरंगने ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘विनेश फोगट ही भारताची वाघीण आहे जिने आज सलग दोन सामने जिंकले. तिने चार वेळा विश्वविजेत्या आणि सध्याच्या ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी जगज्जेत्या कुस्तीपटूचा (कांस्यपदक विजेता) पराभव केला. पण एक सांगू का पण याच मुलीला तिच्या देशात लाथेने चिरडण्यात आले होते. या मुलीला तिच्या देशात रस्त्यावरून सरपटत नेले होते. ही मुलगी जग जिंकणार आहे, पण या देशातील व्यवस्थेविरूद्ध ती हरली.