महाराष्ट्र

Jansanman Yatra : राष्ट्रवादी दिंडोरितून फुंकणार रणशिंग!

Dindori : ‘जनसन्मान यात्रा’ ८ ऑगस्टपासून; अजितदादा साधणार संवाद

NCP : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आघाडी आणि युतीच्या पलीकडे जाऊन आपली बाजू मजबूत करण्यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. 8 ऑगस्टला जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी येथून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.

जनसन्मान यात्रा दिंडोरीनंतर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा प्रवास करणार आहे. पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकशाहीवर आमचा दृढविश्वास असल्यानेच आम्ही ‘जनसन्मान यात्रा’ हे नाव ठेवले आहे असे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले. अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी दिलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचोविणे हा देखील एकप्रकारे जनतेचाच सन्मान आहे, असेही ते म्हणाले. 

राज्याची आर्थिक घडी जराही विस्कटणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. आर्थिक शिस्तीचे एक नवीन पर्व महाराष्ट्रात, सरकारच्या अर्थकारणात अजितदादा पवार यांनी निर्माण केले आहे. लोकशाहीवर दृढविश्वास असल्यामुळे लोकाभिमुख योजना जाहीर केल्या. राज्यातील जनतेने आम्हाला प्रेम आणि विश्वास दिला त्यामुळे आम्ही सगळे काम करत आहोत, असेही तटकरे म्हणाले.

Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, ‘झुठ बोले कौव्वा काटे’

अजितदादांच्या नेतृत्वात यात्रा

अजितदादांच्या ३५ वर्षाच्या राजकीय जीवनाचा मागोवा घेतला तर जनतेचे हित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम त्यांनी केले आहे. अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही ‘जनसन्मान यात्रा’ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार असून याची सुरुवात नाशिक जिल्हयातून करणार आहोत. ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद अजितदादा करणार आहेत. ही यात्रा योजनांपुरती मर्यादित न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्याही अजितदादा जाणून घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

प्रत्येक विधानसभेत कार्यक्रम

या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन सभा किंवा कार्यक्रम घेणार आहोत. महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी अजितदादा संवाद करतील. या संवादात त्यांच्या मनातील भावना समजून घेत सरकारच्या यंत्रणांमार्फत अधिक प्रभावीपणे योजना पोचवण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

२६ ऑगस्टपासून विदर्भात

१५ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राची यात्रा सुरू होईल. ती २२ ऑगस्टपर्यंत मुंबईत येईल. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी विदर्भातून सुरुवात होणार आहे. विदर्भातील नागपूर वेस्ट, काटोल, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, ब्रम्हपुरी, गडचिरोली, अहेरी या मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे. यात्रेत दररोज संध्याकाळी महायुतीतील मित्रपक्षांशी संवाद साधला जाणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!