महाराष्ट्र

Political War : अमरावतीत पुन्हा बच्चू कडू विरुद्ध रवी राणा!

Amravati News : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा दोन नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपाचा सामना रंगला. ते दोन नेते म्हणजे आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू. या दोघांमधील वाद सर्वश्रुत आहेत. आज पुन्हा दोघांमध्ये वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा सामना पाहायला मिळाला.

अमरावतीच्या अचलपूर शहरातील केंद्र सरकारचा उपक्रम असलेली फिनले मिल कोरोना लॉकडाऊनपासून बंद असल्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. या बैठकीत मिलसाठी देण्यात येणाऱ्या 20 कोटी रुपयांच्या निधीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर टीका करीत, ‘आयत्या पिठावर नागोबा’ म्हणत त्यांना डिवचलं. तर, बच्चू कडू यांनीही फिनले मिल बंद असल्यावरुन कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.

अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी (ता. 4) पार पडली. जिल्ह्यात आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपासून वाद रंगताना वारंवार समोर आलं आहे. अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. कुठे श्रेयवाद तर कुठे समस्या यावरून एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यात सर्वश्रुत असलेला आमदार राणा आणि आमदार कडू यांच्यातील वाद पुन्हा आज चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं. बैठकीत मिलसाठी देण्यात येणाऱ्या 20 कोटी रुपयांच्या निधीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली. आता, आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर खोचक टीका केली असून आयत्या पिठावर नागोबा म्हणत त्यांना डिवचलं. तर, बच्चू कडू यांनीही फिनले मिल बंद असल्यावरुन येथील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी या मिलसाठी खासदार नवनीत राणा यांनी व मी सातत्याने प्रयत्न केल्याचे म्हटले. तसेच, आमदार बच्चू कडू यांच्यावर खोचक शब्दात टीकाही केली.

बच्चू कडूंवर टीका

नुकतेच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान, फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे रवी राणा म्हणाले. तर बच्चू कडू विविध जिल्ह्यात जाऊन नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो, नौटंकी करतो, असे म्हणत आमदार राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार प्रहार केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!