Reaction On Statement : उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसाअगोदर केलेले वक्तव्य आणि पुण्यात केलेले भाषण यावरून त्यांची मनस्थिती चांगली नसल्याचे दिसत आहे. त्यांना योग्य हॉस्पिटल आणि योग्य डॉक्टरांची गरज आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्धार केला होता, काश्मिरातील कलम 370 हटले पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमित शाह यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत एक केला. कलम 370 कलम हटविले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले. त्या नेतृत्वावर ज्या पद्धतीने ठाकरे टीका करत आहेत यावरून ठाकरे औरंगजेबी विचारांचे झाल्याचे दिसते अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते भंडाऱ्यात बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या मस्तकात औरंगजेब घुसले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने ते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अरेतुरेची भाषा करीत आहे. अरेला आम्ही कारे करू शकतो. त्यांना जे करायचे ते सारे त्यांनी करावे. आम्ही जनतेमध्ये जाऊ. त्यातून राज्यात डबल इंजिनचे सरकार येईल. एकदा राज्यात सरकार आले की ठाकरेंचा सकाळी नऊचा भोंगा कायम वाजत राहिल. सरकारच्या माध्यमातून जनतेच्या भल्यासाठी आम्ही काम करू आणि तिकडे भोंगा वाजत राहिल. आमच्याकडे विकासकामांची मोठी शिदोरी आहे. आम्ही त्यातून जनतेचे आशीर्वाद घेऊ, असेही बावनकुळे म्हणाले.
बेताल वक्तव्य वाढले
अलीकडच्या काळात ठाकरे बेताल झालेले आहेत. सकाळी नऊचा भोंगा चालूच आहे. निश्चितपणे जनता त्यांना धडा शिकवेल. त्यांनी जनतेमध्ये खोटे पेरले. संविधान बदलणार आहे, असे सांगितले. पण मोदी तेच संविधान हाती घेऊन तिसऱ्यादा प्रधानमंत्री झाले आहेत. आता विरोधक महिलांना खेाटे सांगत आहे. यापूर्वीही विरोधकांनी खोटे सांगितले. आठ हजार रुपये देऊ. पण आता ते नेते गायब झाले आहेत, असे बावनकुळे म्हणाले. अब्दूल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना कार्यक्रमाला बोलावले नाही यावरून ते नाराज आहेत असे सांगण्यात येत आहे. महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे असे बोलले जात आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये धुसफूस नाही.
Atul Londhe : उड्डाणपूल भूमिपूजन भाजपचा की सरकारचा कार्यक्रम
अनुसूचित जाती, जमातींच्या आरक्षणाला आर्थिक निकषांच्या अधारावर क्रिमिलेअर लावण्याला रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचा निकालाचे पूर्णपणे वाचन केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा कोणताही अर्थ काढणे चुकीचे ठरेल. शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळी अदानींचे दोन कर्मचारी तेथे होते, असे सांगण्यात येत आहे. त्याबाबत माहिती नसल्याचे बावनकुळे म्हणाले.